मुंबईत (Mumbai News) काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन (Mumbai Hit And Run Case) प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला. अशातच आता पुन्हा एकदा आणखी एका हिट अँड रन (Hit And Run Accident) प्रकरणानं मुंबई (Mumbai Accident) हादरली आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund News) हिट अँड रनची घटना घडली आहे. एका ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती मिळत आहे.
मुलुंडमध्ये सकाळीच घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं खळबळ माजली आहे. भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. चालक आणि अपघातात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे करणार ‘हे’ महत्वाचे दौरे
Mumbai Hit And Run Case पिंपरीमध्येही हिट अँड रन; महिला जखमी
मुंबईप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवानं यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूनं चाललेल्या महिलेला कारनं समोरून येत धडक दिली. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. त्या चालकाचा शोध आता पिंपरी पोलीस घेत आहे.
Mumbai Hit And Run Case वरळी हिट अँड रन प्रकरणी काय झालं होतं?
शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत आपल्या भरधाव बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला उडवलं होतं. या अपघातात महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खटला सुरू आहे.