मेरिकेत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला वेगळ वळण लागलं आहे. आता येथे जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. (US Election) याबाबत त्यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष 81 वर्षीय बायडन यांच्या मानसिक आरोग्याचा संदर्भ देत, त्यांच्या उमेदवारीबद्दल रिपब्लिकन कॅम्पमधून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा बायडन यांनी आपला प्रचार थांबवण्याची घोषणा केली. दरम्यान, त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस असाही सामना होण्याची शक्यता आहे.
US Election लाइव्ह डिबेटमध्ये पिछाडीवर
दरम्यान, कमला हॅरिस जर विरोधात नसतील तर ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार कोण उभा राहणार याकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांसाठी नवीन उमेदवार शोधणं डेमोक्रॅट कॅम्पसाठी एक नव आव्हान असणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बायडन माघार घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती, जेव्हा लाइव्ह डिबेटमध्ये ते ट्रम्प यांच्यापेक्षा मागे पडलेले दिसले.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते…; अमित शाहांचा घणाघात
US Election गोळीबारानंतर सहानुभुती
निवडणुकीपूर्वी, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प व जो बायडन यांच्यात प्रथमच थेट डिबेट आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ट्रम्प यांचा बायडन यांच्यावर वरचष्मा राहिला होता. अशा स्थितीत बायडन यांनी या शर्यतीतून माघार घ्यावी अशी चर्चा अमेरिकेच्या राजकारणात सुरू झाली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन जनतेमध्ये त्यांच्याविषयी सहानुभुती वाढली होती. त्यामुळे यंदा ट्रम्प बाजी मारणार अशी चर्चा सुरू झाली होती. अमेरिकेत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला वेगळ वळण लागलं आहे. आता येथे जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे