26.6 C
New York

Monsoon Child Health Tips: या पावसाळ्यात मुलांना व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी या 5 प्रभावी टिप्स

Published:

Monsoon Child Health Tips: पावसाळा हा सर्वानाच हवाहवासा वाटणारा एक अतिशय देखणा ऋतू! असं म्हणतात की, मान्सूनचे आगमन हे खूप आनंददायी असते. पावसाळ्याच्या आगमनाने वातावरणात दरवळणारा मृदगंध अगदी मन सुखावणार असतो. सगळीकडेच हिरवळ दाटलेली असते. सर्वत्र रंगीबेरंगी फुललेल्या फुलांचा टवटवीतपणा अगदीच नयनरम्य असतो. पावसाळ्याच्या हवेत गारवा असतो. पावसाळ्यात निसर्ग अत्यंत देखणा पाहायला मिळतो. आशादायक, शांत, आणि विलक्षण आनंद देणारा हा पावसाळ्याचा काळ असतो. मात्र, आरोग्यासाठी तितकासा चांगला नसतो कारण या काळात प्रतिकारशक्ती खालावलेली असते, पचनशक्ती मंदावलेली असते.

Monsoon Child Health Tips: विशेषतः लहान मुलांना पावसाळ्यातील हवामानातील सतत बदलामुळे आणि पावसाच्या विषाणूंच्या तीव्र प्रसारामुळे त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. मुलांना आजार आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची सर्वात अधिक शक्यता असते. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती विकसित होत असते, त्यामुळे त्यांना प्रौढांपेक्षा जास्त त्रास होतो. खरंतर लहान मुलं रोगजनकांच्या संपर्कात येत नाहीत, ज्याच्यामुळे त्यांची इन्फेक्शनपासून प्रतिकारशक्ती कमी होते. शिवाय, मुलं इतर मुलांसोबत खेळण्यात, मैदानात, जिवाणू असलेल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करण्यात बराच वेळ घालवतात. आणि मग ते त्यांच्या चेहऱ्याला, तोंडाला व नाकाला त्याच हातानी स्पर्श करतात, ज्याच्यामुळे बॅक्टेरियांना त्यांचा संसर्ग करणं फारच सोप्प होत. लहान मुलांना लहान वयातच स्वच्छतेची फारशी जाणीव नसते आणि त्यामुळे संसर्ग जास्त होऊ शकतो. या हंगामामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना विषाणूंपासून संसर्ग होण्यापासून वाचावू शकता अशा काही ५ टिप्स आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नोकरी करणाऱ्या पालकांनी बाळाच्या स्तनपानाकडे करु नका दुर्लक्ष

स्वच्छता राखा
Monsoon Child Health Tips: तुमचा मुलगा बाहेरून खेळून आल्यानंतर किंवा बाहेरील बऱ्याच वस्तुंना स्पर्श केल्यामुळे सर्वप्रथम त्याला घरी आल्यावर हात धुण्याचे महत्व शिकवा. लहान मुलांनी त्यांच्या टिफीनला स्पर्श करण्यापूर्वी आणि अन्न खाण्यापूर्वी विशेषतः हात धुवण्यास किंवा सॅनिटायझर वापरण्यास सांगा.

निरोगी आहार असावा
मुलांचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासह सर्वांगीण वाढीसाठी संतुलित आरोग्‍यदायी आहार खूप महत्त्वाचा आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणारे पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करा. आले, हळद, लसूण, पालक, अंडी इत्यादींचा आहारात अधिक समावेश करा. दररोजच्या आहारात फळे, भाज्या, धान्य, लिन प्रोटिन्स अशा आहाराचा तर समावेश केलाच पाहिजे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

अस्वच्छ ठिकाणे टाळा
तुमच्या मुलाला बाहेर जाऊन मित्रांसोबत खेळण्याची फार आवड असेल तर आधी खात्री करा की ते खेळण्याचे क्षेत्र कसं आहे. मलेरिया,(Maleria) डेंग्यू (Dengue) सारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या साचलेल्या पाण्यामध्ये डास आणि हानिकारक जिवाणू जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्यात अधिक धोका निर्माण होतो. डास चावल्याने मुलांच्या रोग प्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला खात्री असणाऱ्या ठिकाणी मूलांना खेळायला पाठवा.

मुलांना उबदार ठेवा
तुमचं मुलं बाहेर पडण्यापूर्वी त्यांना कोरडे, हलके उबदार असणारे कपडे घालण्याची खात्री करा. ओलसरपणा टाळण्यासाठी आपल्या मुलांना जास्त वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहू देऊ नका. असं केल्याने कपड्यांचा ओलावा दूर होईल. जर बऱ्याच वेळा ओल्या कपड्यांमध्ये राहिले तर ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

वैयक्तिक स्वच्छतेबद्धल शिकवा
तुमच्या मुलांना स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखण्यास शिकवा. संसर्गजन्य रोगांचे संक्रमक राखण्यासाठी आणि संभाव्य व्हायरसच्या धोक्यांपासून त्यांना लसीकरण करण्याचे सुनिश्चित करा. अर्थात हात धुणे, केसांची निगा राखणे, आंघोळ करणे, तोंडाची निगा राखणे, नखांची निगा राखणे आणि स्वच्छ कपडे घालणे यासह शिंकताना तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू वापरणे यासारख्या आरोग्यदायी सवयींचे पालन करण्याचे महत्त्व शिकवा. या सोप्या ५ टिप्सचे अनुसरण करून, तुम्ही सामान्य संक्रमणास तुमच्या मुलाच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होण्यापासून रोखू शकता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img