4 C
New York

Ajit Pawra : निवडणुकीसाठी अजितदादांचा एकला चलो रे चा नारा; मेळाव्यातून घोषणा

Published:

पुणे

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहे, पण या मेळाव्यातूनही ते महायुतीचंच सरकार येणार, महायुतीच जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. पुण्यात (Pune) आज भाजप आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. राज्यातील सत्तेत अजित पवारांना सामावून घेतल्यानेच भाजपला फटका बसल्याचा ठपका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरसह भाजपशी संबंधित काही साप्ताहिकांमधून ठेवला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अजित पवारांच्या सहभागाबद्दल संशय निर्माण केला जात असतानाच आता त्यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे.

आज पिंपरी चिंचवड,पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घाय्याचे होते,पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो.काही अफवा पसरवल्या जातात, पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला, विरोध पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले,त्यांना स्वातंत्र आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो.

अजित पवार म्हणाले की, उद्या नगर दौरा असून चार ठिकाणी कार्यक्रम आहे. पण उद्याच्या वाढदिवसाच्या अनेकांनी आजच शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकजण पक्षात आले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आगामी विधानसभा निवडणूक अंदाजे ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केली. त्यामुळे, अजित पवार यांच्या वक्तव्याने महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img