8.7 C
New York

Heavy Rain : मुंबईत पुढील 2 ते 3 तास मुसळधार पावसाची शक्यता

Published:

मुंबई

दोन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे, रस्ते आणि विमान सेवांना फटका बसला आहे. त्यातच रविवारी मुंबई उपनगरात कोसळणाऱ्या (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यातच विक्रोळी रेल्वे स्थानकांवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले होते. रविवार मेगाब्लॉक आणि त्यात पावसामुळे मुंबईकरांना दुहेरी फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील दोन ते तीन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई तसेच उपनगरांत रविवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई,नवी मुंबई,ठाणे शहराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कल्याण,कर्जत,खोपोली,कसारा या भागात मुसळधार पाऊस असल्याने मुंबईकडे येणाऱ्या लोकल,मेल-एक्सप्रेसचा वेग कमी झाला होता. रविवारी सुट्टी असलेल्यांने मध्य रेल्वेने मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि सीएसएमटी – चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावर नियोजित मेगा ब्लॉक घेतला होता.

सायन परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे. सायन उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी झालं आहे. दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये देखील पाणी साचलं आहे. हिंदू कॉलनीला तलावाचा स्वरूप आलं आहे. मुंबई उपनगरात देखील पाण्याचा जोर वाढला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. रस्त्यावर गुडघ्याच्या वरती पाणी साचले असल्याने लोकांना वाट काढत चालावं लागत आहे.

त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर वळवण्यात आल्याने धीम्या मार्गावरील लोकल सेवांना फटका बसला होता. त्यातच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाहूर ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल,मेल-एक्सप्रेसचा वेग कमी झाला होता. त्यामुळे लोकल,मेल-एक्सप्रेसच्या वेगावर निर्बंध आल्याने गाड्या उशिराने धावतात.

मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पालिका प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सखल भागात पाणी साचू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री स्वत: ग्राऊंडवर उतरण्याची शक्यता आहे. ते आज कंट्रोल रुमला भेट देऊ शकतात.

त्यातच रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई, कोल्हापूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून जालना, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा इथं वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img