23.1 C
New York

Manoj Jarange Patil : सामाजिक नेतृत्वाच्या तोंडी विरोधकांची भाषा; जरांगेंवर शिंदे गटाचा हल्लाबोल

Published:

मुंबई

महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच घटकांसाठी महायुती सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सामाजिक नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे विरोधकांची भाषा बोलून या योजनांबाबत चुकीची वक्तव्ये करत आहेत. सामाजिक नेतृत्वाच्या तोंडी विरोधकांची भाषा शोभत नाही, अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजीव भोर (Sanjeev Bhor) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जरांगे पाटील मराठा समाजाचे नेतृत्व करत आहे, मात्र त्यांच्या तोंडून मागील काही दिवसांपासून राजकीय भाष्य केले जात आहे हे दुर्देवी आहे. राज्यात २८८ जागा लढणार, सत्ताधाऱ्यांना पाडणार अशा प्रकारची वक्तव्ये जरांगे पाटील यांनी बोलणे योग्य नाही. सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून या योजनांबाबत फेक नरेटिव्ह पसरवले जात आहेत. मात्र योजनांचा लाभ देण्याची आर्थिक क्षमता सरकारमध्ये आहे, असा विश्वास भोर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ अर्थात युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकरी विज बिल माफी, मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के लाभ, गोरगरिबांना आरोग्य सवलती अशा अनेक जनकल्याणकारी योजनांचे खरे तर एक सामाजिक नेतृत्व म्हणून मनोज जरंगे यांनी स्वागत केले पाहिजे. जरांगे हे सातत्याने गोरगरिबाची लेकरं उपाशी मरतात, लेकरा बाळांचे कल्याण झाले पाहिजेस अशी वक्तवे करतात. मात्र दुसरीकडे ते या जनकल्याणकारी योजनांवर टीका, उपहास करून विरोधी पक्षाच्या तोंडची भाषा करीत असतील तर ते समाजात संभ्रम निर्माण करणारे आहे. सामाजिक आंदोलनाच्या नेतृत्वाने विरोधी पक्षाच्या नेत्यांची भाषा करणे योग्य वाटत नाही त्यांनी ते टाळावे ही माफक अपेक्षा संजीव भोर यांनी व्यक्त केली.

लोकशाहीमध्ये मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून आपणही त्यांचा आदर करतो, असे संजीव भोर म्हणाले. कल्याणकारी योजनांचा मराठा समाजासह तळागाळातील घटकांपर्यंत लाभ कसा मिळेल, यासाठी जरांगे पाटील यांनी सूचना कराव्यात सरकार त्यावर उपाययोजना करेल, मात्र मराठा समाज आरक्षणाचे आंदोलन विरोधकांसाठी राजकीय व्यासपीठ म्हणून आंदण देऊ नये, असे आवाहन भोर यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img