3.6 C
New York

Manoj Jarange Patil : दरेकरांचे नाव घेत फडणवीसांवर मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Published:

जालना

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू असं म्हणत मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर सडकून टीका केलीये. जालन्यातील (jalna) अंतरवली सराटी येथे आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरु आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले, दरेकर आणि आणखी सात ते आठ जणांनी पडद्यामागून मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा संपवला. तुम्हा स्वताच्या स्वार्थासाठी जातीला संपवत आहात. त्यातील एक नंबरचे मारेकरी मला माहीत आहेत, तुम्ही दोन नंबरचे आहात. तुम्ही आणखी कशाकशाचे मारेकरी आहात आणि देवेंद्र फडणवीसांसाठी काय काय करता हे सर्व मला माहिती आहे. दरेकर मराठ्यांच्या लोकांना आमिष दाखवत त्यांना फोडायला लागले आहेत. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजेत. त्यांना फक्त आपली लेकरं महत्त्वाची आहेत. त्यामुळे भाजपमधील मराठ्यांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्ष आणि नेत्याला मोठे मानणास उतावळे आहेत. मला महिती आहे दरेकर मला कसं बदनाम करणार आहेत. तुम्हाला काय करायचेय ते करा, मी मरायला तयार आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस घडवत आहेत आणि दरेकरांनाही तेच बोलायला लावत आहे. दरेकरांच्या डोक्यात फक्त एकच भूत घुसले आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सत्ता

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, असा इशाराच जरांगेंना दिला आहे. यावर आज मनोज जरांगे चांगलेच संतापले असून पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं दिसतंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img