4 C
New York

Devendra Fadnavis : फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

Published:

पुणे

खोटी माहिती देऊन लोकांना लोकसभेला फसवलं. परंतु, आता हे शक्य नाही. कारण खोट हे कधी मोठं होत नसतं. खर हेच मोठ होत असतं. त्यामुळे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) फुगा लवकरच फुटणार आहे. (BJP) मी कार्यकर्त्यांना सांगतो तुम्हाला कुणाची परवानगी लागणार नाही. (Devendra Fadnavis) मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा थेट आदोशच देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. पुण्यात आयोजित केलेल्या भाजपच्या प्रदेश अधिवेशनामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपण फक्त ग्राऊंडवर राहून चालत नाही. ग्राऊंडवर तर काम करतच आहोत. परंतु, सोशल मीडियावर जर अपडेट नाही राहिल तर लोकांना फसवल जाऊ शकतं. त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनाही विनंती आहे की आपण रोज यावर बोललं पाहिजे. रोज एक पोस्ट अशी करा की हा फेक नरेटीव्ह संपला पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधीचीही यावर काही पोस्ट नसते. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. कारण ही लढाई फक्त ग्राऊंडवर नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या. आम्ही 2013 सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. मी आत्मचिंतन करत आहे. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या 90 टक्के कार्यकर्त्यांना माहिती आपल्याला काही मिळणार नाही, पण ते विचारासाठी काम करतात. अजित पवारांच्या महायुतीमधील प्रवेशावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले की नवीन मित्र आल्याने काहींना आवडलं, काहींना आवडलेलं नाही. आपण खुर्चीसाठी काही केलं नाही. काहीवेळा ध्येय सादर करण्यासाठी दोन पाऊल मागे याव लागतं, तर काहीवेळा दोन पावले पुढे जावं लागलं जावं लागतं. आगामी विधानसभेत अडीच कोटी मते घेणार आहोत. मुख्यमंत्री कोण होणार आज विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचा होणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यावेळी भाजप सर्व राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि राज्यात महायुती सरकार येणार, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणचा लढा कधी उभा राहिला. 1982 साली हा लढा उभा राहिला. आण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाची मागणी केली. त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांना आण्णासाहेब पाटील म्हणाले, तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मी तीव देईल. त्यावर ते मुख्यमंत्री म्हणाले नाही देत जा, त्यानंतर आण्णासाहे पाटलांना गोळी घालून घेत स्वत: आत्महत्या केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच पहिला बळी आण्णासाहे पाटील हे आहेत. तसंच, माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे, शरद पावार आणि नाना पटोले यांना. तुम्ही हे जे आंदोलन सुरू आहे त्यामधील जी ओबीसी आरक्षण देण्याची मागणी आहे तीला समर्थन आहे का? हे सांगा अस जाहीर आव्हान फडणवीसांनी यावेळी दिलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img