Cold & Cough Home Remedies: पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. जशा पावसाच्या सरी बरसायला चालू झाल्या की जितक्या वेगाने परिसर सगळा व्यापून घेतात तितक्याच वेगाने बरेच आजार सुद्धा डोकं वर काढायला सुरुवात करतात. पावसाच्या महिन्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला, पोट-दुखी असे आजार अनेकांना छळत असतात. आणि अशातच एक चांगली गोष्ट अशी की या आजारांवर आपला जुना संबंध पाहिलात, तर यांना पळवून कसं लावायचं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. फक्त आणि फक्त आपल्या आजीबाईंच्या बटव्यातील उपाय एक एक करून बाहेर जरी काढलात तरी या सर्दी-खोकल्याचा ताप कमी होऊ शकतो. अशातलाच एक चांगला उपाय म्हणजे काढा. थांबा थांबा काढा असं वाचून लगेच तोंड वाकडं नका करू. आपला आजचा काढा आरोग्यदायी जरी असला तरी चवीलासुद्धा काय कमी नाही. मध, काळी मिरी, आणि तुळस असा हा काढा तुम्हाला कशाप्रकारचे फायदे करून देऊ शकतो व त्याची रेसिपी काय आहे हे आपण आता पाहूयात.
शक्ती तुळशीच्या पानांची (Benefits Of Tulsi)
Cold & Cough Home Remedies: तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. आयुर्वेदामध्ये तर तुळशीच्या चार पानांचे देखील अनन्यसाधारण महत्व आहे. याच कारण असं की, तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तुळशी ऑक्सिडेटिव्ह आरोग्य सुधारण्यास आणि तणावाचा सामना करण्यास मदत करू शकते. तुळशीच्या पानाचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आयुर्वेद रिसर्चच्या संशोधनानुसार, तुळशी ही शरीराची संक्रमणाशी लढण्यास आणि संरक्षण यंत्रणा वाढवण्यास मदत करते.
काळी मिरीचा मॅजिक फॅक्ट (Health Benefits Of Black Pepper)
Cold & Cough Home Remedies: काळी मिरी फक्त एक मसाला नाही तर त्याचे आरोग्यासाठी होणारे महत्त्वपूर्ण फायदे देखील आहेत. पाचक एंझाइमचे उत्पादन काळी मिरी उत्तेजित करते. पोषक तत्वांचे शोषण करण्यात शरीराला खूप मदत करते. काळी मिरी आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारते, तर पाइपरिन जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते.
सावधान! पावसाळ्यात फंगल इंफेक्शनपासून धोका; ‘हे’ ४ टिप्स फॉलो करा आणि मिळवा आराम
गोडवा मधाचा (Healthy Benefits Of Honey)
मध एक नैसर्गिक पदार्थ आहे जो गोडवा प्रदान करतोच पण त्याचे ही अनेक औषधी फायदे आहेत. मधामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. विविध रोगजनकांच्या वाढीस मध प्रतिबंध करू शकतो. खोकला, घसा खवखवण्यासाठी हा एक सर्वात प्रसिद्ध उपाय आहे. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि खोकला कमी करण्यासाठी मध प्रभावी ठरू शकतो.
आता या तिघांचा कॉम्बो का आहे बेस्ट?
मध, तुळशीची पाने, आणि काळी मिरी या तिघांना एकत्रित केल्यावर एक शक्तिशाली काढा तयार होतो. या तिघांचं मिश्रण सहसा सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी करण्यासाठी वापरले जाते. या तिन्ही घटकांचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म श्वसनमार्ग साफ करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. मधाचा चविष्ट गोडवा, तुळशीचे श्वसनामार्फत आरोग्य सुधारण्याची क्षमता, आणि काळी मिरीमधील असलेले दाहक-विरोधी गुणधर्म दमा आणि ब्राँकायटिसच्या लक्षणांना सुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.