10 C
New York

Ajit Pawar : विधानसभेबाबत अजित पवारांच्या डोक्यात कोणती ‘स्क्रिप्ट’?

Published:

पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) काही नगरसेवकांसह अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यातच आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुका जवळ आल्या की लोक इकडे तिकडे जातात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आता निवडणुका जवळ आल्या आहे. त्यामुळे अनेक लोक इकडे तिकडे जात आहे. त्यांना निवडणुका लढण्याची इच्छा असते. पण जागा आपल्याला सुटणार की नाही याबद्दल शंका असते. तेव्हा अशा घटना घडत असतात. माझा याविषयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. आताशी सुरुवात आहे. पुढे अशा गोष्टी जास्त प्रमाणात होणार, आमच्यकडेही लोक येवू पाहताहेत. असं अजित पवार म्हणाले. तसेच पिंपरी चिंचवड मधील अजित गव्हाणे यांना गेल्यावेळी मी उमेदवारी देणार होतो मात्र तो त्यावेळी विदेशात होते असेही अजित पवार म्हणाले.

अखेर अजित पवारांनी सांगितलं गुलाबी रंगाच्या जॅकेटचं रहस्य

तसेच आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री कोण होणार? याचा विचार आम्ही केला नाही. तसेच या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल याची काळजी तुम्ही करू नका. यावेळी फक्त मला विकास आणि गरिबी कमी करण्याविषयी विचारा असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar कर्जमाफी दिली होती ती चालली की नाही?

नुकतंच राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीका होत आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत म्हणाले की, त्यांच्याकडून या योजनेला चूनावी जूमला म्हणून म्हणण्यात येत आहे मात्र मागे कर्जमाफी दिली होती ती चालली की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. काही राज्यातील योजना महिलांना उपयुक्त ठरतात. त्या आम्ही स्वीकारल्या, त्या त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येतो. आम्ही योजना गरिबांसाठी आणतो. समाजाच्या हितासाठी योजना आणल्या आहेत. आता आम्ही योजना आणल्या त्याला विरोधक कसे चांगले म्हणणार? जनतेसाठी या योजना आणल्या आहे. त्या पुढे चालू ठेवायचा असतील तर जनतेने आम्हाला सपोर्ट करावा तरच त्या योजना पुढच्या काळात सुरू राहतील. असं यावेळी अजित पवार म्हणाले. तर मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी तयार करणार नाही. अशा बातम्या तुम्हीच देता. त्यातून माझी करमणून होते, या कानाने ऐकतो आणि दुसऱ्या ने सोडून देतो.असेही अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img