महिला उद्योजकांच्या (Women entrepreneurs)संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसतेय. (Government Schemes) तरीही अनेक महिला उद्योजकांकडे अपुरे भांडवल असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात (industrial sector)प्रवेश करता येत नाही. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून(Central Govt) अनेक योजना आणत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
Government Schemes उद्योगिनी योजना काय आहे?
केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी योजना सुरू केली आहे. यात पाच लाखांपर्यंत कर्ज विनातारण अर्थातच काहीही गहाण न ठेवता काही महिलांना मिळते. या योजनेंतर्गततर काहींना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. महिलांना स्वावलंबी होणे, स्वतःच्या पायावर उभे राहून घराला आर्थिक हातभार लावणे सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे. काही वेळेला त्यांनी केलेली बचत अपुरी पडते. अशावेळी ही योजना त्यांना फायदेशीर ठरते.
Government Schemes कर्ज कोणत्या कामासाठी मिळते?
उद्योगिनी योजनेंतर्गत बांगड्या बनविणे, ब्यूटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल बनविणे, बुक बायंडिंग, नोटबुक बनविणे, कॉफी आणि चहा बनविणे, कापूस धाका उत्पादन, रोपवाटिका, कापड व्यवसाय, दूग्ध व्यवसाय, पोल्ट्री संबंधित व्यवसाय, डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय, ड्रायक्लिनिंग लॅब व्यवसाय, ड्रायक्लिनिंग, सुक्या मासळीचा व्यापार, खाद्यतेलाचे दुकान, नायलॉन बटण उत्पादन, जुने पेपर मार्ट, पापड निर्मिती यांच्यासह विविध व्यवसायांसाठी उद्योगिनी योजनेंतर्गत महिलांना पाच लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नीटचा निकाल पुन्हा जाहीर
Government Schemes महिलांना तीन लाखांपर्यंत अत्यल्प व्याजात कर्ज
महिलांसाठी केंद्राने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. उद्योगिनी योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते.
Government Schemes निकष काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महिला असणे आवश्यक आहे. पात्र वयोगटांची श्रेणी 18 ते 55 इतकी आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.5 लाखापर्यंत, व्यवसाय कर्जासाठी फक्त महिला व्यवसाय मालक होण्यास पात्र आहेत. विविध बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्योगिनी योजनेंतर्गत तीन लाखांपासून ते पाच लाखांपर्यंत कर्ज मिळते. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती यांचा समावेश आहे.
Government Schemes आवश्यक कागदपत्रे :
– अर्जासोबत पासपोर्ट दोन फोटो
– आधार कार्ड
– दारिद्रयरेषेखालील व्यक्तीचे रेशनकार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– रहिवासी दाखला
– जन्म दाखला
– जात प्रमाणपत्र
– बँक खाते बुक
Government Schemes अर्ज कुठे करायचा?
उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही राष्ट्रीय आणि खासगी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्जाची पडताळणी केल्यानंतर कर्ज मिळते.