1.4 C
New York

Microsoft Window : मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे?

Published:

शुक्रवारी (19 जुलै) मायक्रोसॉफ्ट विंडोजची (Microsoft Window) कार्यप्रणाली कोलमडून पडली. देशभरातली वेगवेगळे उद्योग, व्यापार, हवाई वाहतूक, शेअर मार्केट, कॉर्पोरेट कंपन्या यांनात्याचा परिणाम म्हणून फटका सहन करावा लागला. अनेकांचे वेगवेगळ्या स्तरावर या तांत्रिक बिघाडामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे ही सगळी व्यवस्था कोलमडून गेली होती? याबाबतची माहिती समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टमधल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतात इंडिगो, स्पाईसजेट, अकासा, एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा बाधित झाल्या आहेत. तर जगात अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या विमान उड्डाणांमध्येही अडचणी आल्या आहेत.

मायक्रोसॉफ्ट अझुर आणि मायक्रोसॉफ्ट 365 या दोन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला. यापैकी अझूर सॉफ्टवेअर हे मोठमोठ्या कंपन्या वापरतात. विमानतळं, काही देशातले टीव्ही चॅनल्स, बँका, शेअर बाजार, इथल्या कारभारासाठी अझूर सॉफ्टवेअर प्रणालीवर काम होतं. तर मायक्रोसॉफ्ट 365 च्या आधारानं तुमच्या-आमच्या कॉम्प्युटरमध्ये असणारे मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपाँईटचा समावेश होतो. आता या दोन्ही सॉफ्टवेअरच्या देखभालीची जबाबदारी क्राउडस्ट्राइक एक दुसरी कंपनी करते. माहितीनुसार त्याच क्राऊडस्टाईकच्या अपडेशनमध्ये बिघाड झाला.

‘मायक्रोसॉफ्ट क्रॅश’ने जग हैराण

Microsoft Window मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड

शुक्रवारी अचानकपणे मायक्रोसॉफ्ट विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या कॉम्प्यूटर्सवर थेट निळ्या रंगाची स्क्रीन आली होती. या निळ्या स्क्रीनमुळे कॉम्यूटरवर कोणतेही काम करता येत नव्हते. परिणामी वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व कामे ठप्प पडली होती. यामध्ये बँकिंग, हवाई वाहतूक, कॉर्पोरेट, शेअर मार्केट, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीवर आलेली ही अडचण क्राउडस्ट्राइक (CrowdStrike) या कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे आली असा, दावा केला जातोय. आलपे फालक्न नावाचे सॉफ्टवेअर या कंपनीकडून अपडेट करण्यात येत होते. पण विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये या अपडेटिंगदरम्यान मायक्रोसॉफ्टच्यातांत्रिक बिघाड निर्माण झाला. या अडचणीनंतर क्राउडस्ट्राइकने आपले हे सॉफ्टवेअर अपडेट मागे घेतले आहे. विंडोज वापरकर्त्याच्या संगणकावर होणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून रक्षण करण्याचे काम करणाऱ्या क्राऊडस्ट्राइकच्या ‘फाल्कन सेन्सर’ सॉफ्टवेअरच्या एका अपडेटमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर विंडोज कार्यप्रणाली क्रॅश झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Microsoft Window नेमके काय घडले?

भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास, जगभरातील बँका, विमान वाहतूक सेवांच्या व्यवहारांमध्ये अडथळे येऊ लागले. ‘ऑफिस ३६५’ हे मायक्रोसॉफ्टचे ऑफिस सॉफ्टवेअर काम करेनासे झाले. तसेच मायक्रोसॉफ्टची विंडोज कार्यप्रणालीच क्रॅश होऊन ‘एरर स्क्रीन’ दिसू लागली. विंडोज १० आणि त्यापेक्षा अद्ययावत विंडोज कार्यप्रणाली वापरणाऱ्या संगणकांवर इंटरनेटशी संलग्न राहून काम करणारे ‘ऑफिस ३६५’ चालेनासे झाल्याने त्यावर अवलंबून असलेले सर्वच क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले.

Microsoft Window ‘ईडीआर’ सॉफ्टवेअर म्हणजे काय?

सायबर सुरक्षेतील महत्त्वाचे ‘एन्डपॉइंट डिटेक्शन ॲण्ड रिस्पॉन्स’ अर्थात ‘ईडीआर’ हे साधन आहे. हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचे संगणक हॅकरपासून सुरक्षित ठेवते. हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या संगणकात पडद्यामागे (बॅकग्राऊंड) कार्यरत राहून त्यावर होऊ घातलेल्या हल्ल्यांवर लक्ष ठेवते. या सॉफ्टवेअरमध्येच शुक्रवारी बिघाड झाल्याने विंडोज प्रणाली कोलमडली. सर्वच संगणकांची स्क्रीन निळ्या रंगाने व्यापून गेली. त्यापलीकडे त्यावर काहीही करणे अशक्य झाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img