9.5 C
New York

Manoj Soni : UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा

Published:

केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) सध्या देशभरात चर्चेत आहे. आता याच आयोगासंदर्भात (UPSC) मोठी बातमी समोर आली आहे. युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी (Manoj Soni) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यामागे त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केला आहे. सोनी यांनी एक महिना आधीच राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा स्वीकारला जाणार किंवा नाही याबाबत खात्रीशीर माहिती देता येत नाही. सोनी सन 2017 मध्ये युपीएससीचे सदस्य म्हणून सहभागी झाले होते. 16 मे 2023 रोजी त्यांनी युपीएससीचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे निकटवर्तीय म्हणून सोनी यांची ओळख आहे. पीएम मोदींनी सन 2005 मध्ये त्यांना बडोदातील प्रसिद्ध एमएस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले होते. चाळीस वर्षात मनोज सोनी देशातील सर्वात युवा कुलगुरू होते. युपीएससी एक संवैधानिक संस्था आहे. केंद्र सरकारतर्फे विविध परीक्षांच्या आयोजनाची जबाबदारी या संस्थेवर आहे. युपीएससीकडून दर वर्षी भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) परीक्षा आयोजित केली जाते. भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS), सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ए, ग्रुप बी मध्ये नियुक्तीसाठी उमेदवारांची शिफारस युपीएससीकडून केली जाते.

Manoj Soni पूजा खेडकर प्रकरणात UPSC ची चर्चा

युपीएससी सध्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आहे. आयएएस 2023 बॅचच्या अधिकारी पूजा खेडकर पुण्यात प्रशिक्षणा दरम्यान वादात सापडल्या होत्या. या काळात अधिकारांचा गैरवापर आणि परीक्षेत बोगस कागदपत्रांच्या वापराचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img