19.7 C
New York

Uddhav Thackeray : मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

Published:

मुंबई

धारावीकरांना (Dharavi Redevelopment) त्यांचं घर जिथल्या तिथं मिळालं पाहिजे. फसव्या योजनांमागे काँट्रॅक्टर मित्रांचं भलं करण्याचा यांचा डाव आहे. मुंबईला अदानी सिटी (Adani City) करण्याचाही यांचा डाव आहे. पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण सर्वांसमोर आहे. अदानींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आम्ही उधळून लावणार. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आता आली आहे. जास्तीच्या टीडीआरचा धारावीच्या टेंडरमध्ये कुठेच उल्लेख नाही. लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र सुटबूटवाला ही योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारला विचारला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणांचा पाऊस पडत आहे. लाडकी बहीण-भाऊ वगैरे सुरू असतानाच लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती अशी योजना सुरू झाली आहे. गेल्या वर्षी आम्ही धारावीत मोर्चा काढला होता. आमची मागणी आहे की, धारावीवासियांना आहे तिथेच 500 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर मिळालेच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, तसेच, धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर तिचे वेगळेपण आहे. तिथे एक इंडस्ट्रियल इस्टेट आहे. तिथे प्रत्येक घरात मायक्रोस्केल उद्योग चालतात. त्यात कुंभार आहेत, चामड्याचा उद्योग आहे. इडलीचा उद्योग आहे. इतरही छोटे उद्योग आहेत. पण आता अदानीला धारावीचे टेंडर द्यायचा डाव आम्ही उधळून देणार आहोत. मोदी-शाह मुंबईला अदानी सिटी करणार आहेत. उद्या कदाचित मुंबईचे नावही बदलून अदानी सिटी करतील, पण आम्ही धारावीवासियांना उद्ध्वस्त करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मुंबईला भिकेला लावण्याचे कारस्थान आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, धारावीत अनेक अनेक उद्योग आहेत त्यांचं काय करणार आहात. त्यांचे उद्योगही त्याच ठिकाणी सुरू होऊन धारावीकरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे. अदाणीला जे टेंडर दिलं आहे त्यात जे मेन्शन केलं आहे त्यापेक्षा जास्त देण्यात येत आहे. 300 एकर जमीन गृहनिर्माणासाठी आहे. बाकीच्या भूभागावर बाकीचे उद्याने वैगेरे आहे. पण, वाढीव टीडीआर कुठेच नाही. पात्र अपात्र लोक ठरवताना धारावीतील लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बाकीचे क्षेत्र लाटले जात आहे. रेल्वेची जागा देखील घेत आहेत. धारावीकरांना रेल्वेच्या ट्रांझिट कॅम्पमध्ये हलवायचा आणि बाहेर करायचा प्रयत्न आहे. टेंडर अदानीसाठी केलं आहे. सरकारने त्यांच्या मित्रासाठी केलेला हा खटाटोप आहे. पण या टेंडरमध्ये धारावीवासियांच्या पोटापाण्याचे काहीच नाही. एकूण 20 ठिकाणी धारावीच्या लोकांना हलवणार आहे. त्यामुळे बाकीच्या मुंबईवर देखील ताण येणार आहे. त्यामुळे धारावीवासियांना 500 फुटाचे घर ते आहेत तिथेच मिळाले पाहिजे. या टेंडरच्या विरोधात जर कुणी न्यायालयात गेलं तर हे टेंडर लगेचच रद्द होईल यात काहीच शंका नाही. अदानींसाठी लाडका कॉन्टॅक्टर मधून हे टेंडर काढला आहे का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img