9.5 C
New York

IND vs SL : सूर्याला वनडेत डच्चू, संघ निवडीत ‘या’ खेळाडूंना संधी

Published:

भारत आणि श्रीलंका यांच्यात (IND vs SL) येत्या 27 जुलै पासून क्रिकेट मालिकेस सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन टी 20 आणि तीन वनडे सामने होणार आहेत. या मालिकेसाठी हेड कोच गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संघाची निवड केली आहे. यंदा जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी मिळेल असे वाटत होते. मागील काही वर्षांपासून असाच ट्रेंड दिसून येत आहे. सिनियर खेळाडूंना विश्रांती आणि युवा खेळाडूंना संधी असे समीकरण राहिले होते. आता मात्र गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भविष्यावर लक्ष केंद्रित करून भूमिकेनुसार संघ निवड केली आहे.

हार्दिक पांड्या ऐवजी (Hardik Pandya) सूर्यकुमार यादवकडे टी 20 संघाचे नेतृत्व (Surya Kumar Yadav) सोपवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीने अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यावरून आगामी काळात संघ कसा राहील याचा अंदाज येतो. सूर्यकुमार यादवला टी 20 संघाचा कर्णधार करण्यात आले मात्र वनडे संघात त्याचा समावेश केलेला नाही. आयपीएलमधील राजस्थान संघाचा रियान पराग (Riyan Parag) डार्क हॉर्स ठरला. टी 20 आणि वनडे संघात त्याला संधी मिळाली. चला तर जाणून घेऊ या की वनडे संघात सूर्याला का संधी मिळाली नाही आणि रियान परागला दोन्ही संघात का संधी मिळाली.

IND vs SL वनडे संघात सूर्याला का डावलले?

मागील वर्षातील वर्ल्डकपमध्ये फक्त एकच फलंदाज संघर्ष करताना दिसला होता. हा खेळाडू सूर्यकुमार यादव होता. वनडे सामन्यात मात्र तो कितपत चांगले प्रदर्शन करील याची खात्री येत नाही. पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू (Champions Trophy) होण्याआधी फक्त सहा सामने शिल्लक राहिले आहेत त्यामुळे निवड समितीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेही सूर्यकुमारची कामगिरी टी 20 सामन्यातच चांगली राहिलेली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याचे आतापर्यंतचे प्रदर्शन चांंगले राहिलेले नाही. त्याला डावलण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

‘मायक्रोसॉफ्ट क्रॅश’ने जग हैराण

IND vs SL रियान परागला झुकते माप का मिळाले?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रियान पराग पाच नंबरवर खेळत होता. विजय हजारे ट्रॉफीत परागने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या खेळात कोणताही बदल न करता वेगात धावा करण्याची किमया परागने साध्य केली आहे. डावाला आकार देणे असो किंवा सुरुवातीच्या विकेट पडल्यामुळे झालेले नुकसान असो त्याची भरपाई करण्याचे काम रियान पराग चांगल्या पद्धतीने करतो. संघाचे असे मानने आहे की परागला तळाच्या फलंदाजीसाठी तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे रियान पराग पाच नंबरवर फलंदाजी करताना दिसू शकतो.

IND vs SL शुभमन गिलचं प्रमोशन

नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषकात शुभमन गिल भारतीय स्क्वॉडमध्ये देखील नव्हता. आता मात्र श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला थेट संघाचा उप कर्णधार केलं आहे. या निवडीतून गंभीरने 2027 मधील विश्वचषकावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. रोहित शर्मा 37 आणि सूर्यकुमार यादव 33 वर्षांचा असल्याने गंभीर संघात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

IND vs SL केकेआरच्या दोन स्टार्सना गंभीरचा सपोर्ट

कसोटी क्रिकेट टाळून बीसीसीआयच्या निशाण्यावर आलेल्या श्रेयस अय्यरचा वनवास संपला आहे. सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर अय्यर पुन्हा राष्ट्रीय संघात परतला आहे. गंभीरने अय्यरची निवड करणं यात फार काही आश्चर्य नाही. कारण या दोघांनी केकेआर संघाला 2024 मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं होतं. केकेआरला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हर्षित राणा (वनडे) आणि रिंकू सिंह (टी20) देखील गंभीरने निवडलेल्या संघाचा हिस्सा आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img