23.1 C
New York

Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विलंबाने

Published:

शनिवार पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. (Mumbai Local)हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणखी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली असून पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरही होणार आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू आहे. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५-१० मिनिटे उशीराने सुरू आहे. तसेच १५ ते २० मिनिटे हार्बर लाईनवरील लोकलही उशिरा आहे.

Mumbai Local सखल भागांत साचलं पाणी

शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले आहेअनेक सखल भागात मुंबईतील पाणी साचायला सुरवात झाली आहे. मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला असून आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे . पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

आज मुसळधार! दोन जिल्ह्यांना रेड तर ‘या’ नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Local कुठे , काय परिस्थिती ?

अंधेरी सबवे येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरूवात झाली असून तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. भांडुप एल बी एस मार्ग पहाटे पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र थोड्या वेळापूर्वी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून तेथेही अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचल्याचे वृत्त आहे.

Mumbai Local नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेजेसना सुट्टी

मुंबईसह राज्यभरातही आज पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नागपूरमध्येही सकाळपासून धो-धो पाऊस कोसळत असून जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आले. नागपुरातील विमानतळ परिसरातही पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसामुळे आज शहरातील सर्व शाळा – कॉलेजसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे विपीन ईटनकर यांनी हे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img