आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा आंबेडकरांनी केली. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही कोणताही आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही. अशातच आज आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना आरक्षण बचााव यात्रेची घोषणा केली. ते म्हणाले, ओबीसींचा लढा हातामध्ये घ्या, सध्या जी परिस्थिती आहे ती भयानक होत आहे, असं मला काहीजण म्हणत होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
भाजपचं ठरलं, आता विरोधकांना सुट्टी नाही, नेत्यांची टीम तैनात
Prakash Ambedkar 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा
25 जुलैला दादरच्या चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रा होणार आहे. त्याचं दिवशी पुण्यातील फुले वाड्यात जाऊन महात्मा फुलेंच्या स्मृतींना अभिवादन केलं जाणार आहे. त्या दिवसचा रात्रीचा मुक्काम कोल्हापूरला केला जाईल. 26 जुलैला शाहु महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करून यात्रा सुरू होईल.
26 तारखेला ही यात्रा हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली आणि मिरज मार्गे पुढं जाणार आहे. तर सांगोला, पंढरपुर, मोहोळ, आणि सोलापूर मार्गे मराठवाड्यात यात्रा 27 जुलैला पोहोचेलं. नंतर विदर्भात जाईल. संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. 7 किंवा 8 ऑगस्टला सांगता होतील, या यात्रेत बैठका आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. भाजप हा वैदीक ब्राम्हणांचा पक्ष आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) हा सीकेपीचा पक्ष आहे. ओबीसींचं काही देणं-घेणं या पक्षांना नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केली.
पुढं बोलतांना ते म्हणाले, राजकीय पक्ष पळवाटा काढत आहेत. हे राजकीय पक्ष ओबीसींबाबत कोणतीही भूमिका घेणार नाहीत. मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय अन् न राहिले कायत्यांनी ओबीसींबाबत भूमिका घेतली नाही तर , त्यांना देणं-घेणं याचंही नाही, असंही आंबेडकर म्हणाले.