21 C
New York

Navra Majha Navsacha 2: पुन्हा खळखळून हसायला व्हा सज्ज…‘नवरा माझा नवसाचा २’ येतोय ‘या’ दिवशी!

Published:

Navra Majha Navsacha 2: मराठी सिनेसृष्टीला ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट आहे. हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला की सर्वांच्याच घरी हास्याच्या लहरी उमटतात. आता पुन्हा एकदा खळखळून हसण्यास व्हा सज्ज… कारण या चित्रपटाचा दुसरा भाग लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शित सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट येणाऱ्या 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

नवरा माझा नवसाचा 2’ होणार या दिवशी प्रदर्शित
Navra Majha Navsacha 2: नुकतंच ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या टीमने मुंबईमधील श्री. सिद्धिविनायक मंदिरात जाऊन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. येत्या सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शित सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि लाडके अभिनेते अशोक सराफ उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे संवाद संतोष पवार यांनी लिहिले आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा एक रिलीज डेटचा टिझर देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

सिनेमात कोण-कोण कलाकार?
Navra Majha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे,आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याच्याशिवाय ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसीची भूमिका साकारणार आहेत.

अर्जुन कपूरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत;

‘नवरा माझा नवसाचा ‘ हा चित्रपट निव्वळ कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये नक्की काय घडणार ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी रसिक प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहायला लागणार आहे. रिलीज डेट जाहीर करताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img