3.6 C
New York

MVA : नाना पाटोलेंनी सांगितला विधानसभेतील मविआचा चेहरा…

Published:

लोकसभेत 31 जागांवर विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत काँग्रेस (Congress) , शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) (NCP) अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही.

तर दुसरीकडे काँग्रेस या निवडणुकीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्य पातळीवरच होणार असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहिल अशी माहिती दिली आहे. आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, खासदार व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर; मविआतही धुसफूस?

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्यातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिघडवली आहे. सरकारकडून आज मुंबई आणि राज्यातील महत्वाच्या जमिनी अदानीला दिल्या जात आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहे असा आरोप नाना पटोले यांनी या पत्रकार परिषदेमध्ये लावला.

तसेच राज्यातील शेतकरी संकटात आहे. भाजपच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून आतापर्यंत 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही मात्र उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1700 कोटी रुपयांचे कर्ज माफ अनिल अंबानी काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरु झालेली नाही. आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित करणार आहे आणि त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्य पातळीवरच होणार असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहिल. असं नाना पटोले म्हणाले. तसेच भाजपने 2014 पासून देशात फेक नेरेटिव्ह पसरवले आहे पण काँग्रेस फेक नेरेटिव्हला काँग्रेस जशास तसे उत्तर देत आहे आणि पुढे देखील देणार. असेही यावेळी नाना पटोले म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img