18.6 C
New York

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ ?

Published:

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात युपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर (UPSC) गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची एन्ट्री झाली आहे. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का या महत्वाच्या मुद्द्यासह अन्य गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगानेही (युपीएससी) काल तपासणी अहवाल आल्यानंतर पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर यांनी OBC प्रवर्गाचा गैरवापर केलाय हे तपासणार आहे. तसेच आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरांसदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. आयोगानं याबाबत वैयक्तिक प्रशिक्षण विभागाकडे (डीओपीटी) विचारणा केली. आयोगाकडून आता लवकरच एक ड्राईव्ह सुरू केला जाणार आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. आता आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

IAS Pooja Khedkar खेडकर कुटुंबियांची कंपनी सील

तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pune News) सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दोन लाख 77 हजार रुपयांचा कर या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा थकीत आहे. दोन लाख 77 हजार रुपयांचा कर यामुळे कंपनीला सील ठोकले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img