निर्भयसिंह राणे
ब्रिटिश मीडियाच्या म्हणण्यानुसार, मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) फॉरवर्ड मार्कस रॅशफोर्डला (Marcus Rashford) त्याच्या रोल्स-रॉइसमध्ये वेगात चालवल्याबाबत सहा महिन्यांची बंदी घालण्यात अली आहे. 26 वर्षीय रॅशफोर्ड ओव्हरस्पिडिंग करताना पकडला गेला होता. तो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मँचेस्टरमध्ये M60 वर 104 MPH वेगाने गाडी चालवत होता.
ब्रिटिश मीडियाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या अधिकाऱ्याने पृष्टि केली की राशफोर्डवर बंदी घालण्यात अली होती आणि त्याला £1,666 दंड ठोठावण्यात आला होता आणि £120 न्यायालयीन खर्च आणि £६६ अधिभार भरण्याचे आदेश दिले होते. सिंगल जस्टीस प्रोसिजर अंतर्गत, राशफोर्डने गुन्हा काबुल केला. कॅरिंगटन ट्रेनिंग ग्राउंड सोडल्यानंतर वतीन महिन्यांच्या कालावधीत, त्याने दुसऱ्यांदा ओव्हरस्पीडींग करताना पकडला गेला.
IND vs SL : सूर्याला वनडेत डच्चू, संघ निवडीत ‘या’ खेळाडूंना संधी
राशफोर्ड अलीकडेच युरो 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या इंग्लंड टीम मध्ये त्याचे स्थान हुकला होता. रॅशफोर्ड हा माजी मुख्य प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा एक प्रमुख खेळाडू आहे. तो 2018 आणि 2022 मधील मागील दोन विश्वचषकांसाठी इंग्लंडच्या संघाचा भाग होता. त्याने 2021 मध्ये इंग्लंडच्या मागील युरो संघाचा सुद्धा भाग होता. नुकत्याच संपलेल्या प्रीमियर लीग हंगामात रॅशफोर्डचा फॉर्म खूपच घसरला आहे.
रॅशफोर्डने संपूर्ण हंगामात सर्व स्पर्धांमध्ये फक्त आठ गोल केले. 42 सामन्यांमध्ये त्याचे आठ गोल आणि पाच असिस्टने मँचेस्टर युनायटेडसाठीचा त्याचा हंगामाचा एक चांगलाच सारांश दिला. 2016/17 च्या मोहिमेनंतर गोल मरण्यासाठीच त्याचे आऊटपूट हे सर्वात कमी झाले. त्याने संपूर्ण हंगामात त्याच्या पूर्वीच्या स्वतःच्या स्किल्सचा पाठलाग केला. 2023 मध्ये, रॅशफोर्डने सर्व स्पर्धांमध्ये 30 गोल केले आणि त्याला त्याच्या क्लबचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा मान सुद्धा मिळाला.