2.5 C
New York

Fungal Infection: सावधान! पावसाळ्यात फंगल इंफेक्शनपासून धोका; ‘हे’ ४ टिप्स फॉलो करा आणि मिळवा आराम

Published:

Fungal Infection: अखेर उन्हाच्या कडाख्यापासून आराम! पावसाळा सुरु झाला आहे आणि पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. पावसाळा सुरु झालाच की अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. पावसाळ्यामध्ये अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त वाढतो. सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, यांसारख्या आजारांसोबत अनेक संसर्गजन्य आजारही पावसाळ्यात वेगाने पसरतात. पावसाळ्यात भिजायला मज्जा वाटते मात्र भिजल्यामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन म्हणजेच (बुरशीजन्य) आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. नाहीतर फंगल सारख्या आजारांना बळी पडण्याची वेळ येऊ शकते. असं होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

Fungal Infection: पावसाच्या घाणेरड्या पाण्यामुळे कधीकधी बुरशीजन्य आजाराची समस्या उद्भवते. यामध्ये त्वचा लालसर होणे, त्वचेवर खाज येणे, लहान पुरळ येते, हात-पायांवर लाल चट्टे उठणे अशा बऱ्याच प्रकारचं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. हा फंगल इन्फेक्शनचा आजार तेव्हाच होतो जेव्हा बाहेरची बुरशी येऊन आपल्या शरीरातील काही खास भागांवर येऊन चिटकते. असं झालं आणि त्यातसुद्धा आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर आपलं शरीर या बुरशीला प्रतिकार करू शकत नाही. यामुळेच असा फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार घेणं फार गरजेचं असतं. चला तर मग जाणून घेऊया फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय…

‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, कंपनीने शेअर केली पहिली झलक

त्वचा नेहमीच कोरडी ठेवा
Fungal Infection: पावसाळ्यात जास्त ओलाव्यामुळे स्किनवर बुरशीची वाढ जास्त होऊ शकते. ज्यावेळी आपण पावसात भिजून येतो त्यांनतर आपली त्वचा पुसून कोरडी करावी. फंगलचा धोका हाताखाली, पायांच्या जांघांमध्ये, पायांची बोटे, आणि स्तन यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, म्हणून शरीरातील हे भाग चांगले पुसून कोरडे करावेत.

मीठाच्या पाण्यात पाय बुडवावेत.
बाहेरून पावसातून भिजून आला असाल तर अस्वच्छ पाण्यामुळे पाय खराब झाले असतील किंवा काही इन्फेक्शन झालं असेल तर हा उपाय घरी नक्की करून बघा. घरी आल्यावर पहिले पाय धुवा. नंतर एका टबमध्ये किंवा बदलीमध्ये तुम्हाला सोसवेल इतकं गरम पाणी घ्या त्यात २ चमचे मीठ घाला. त्यानंतर त्यात पाय बुडवून बसा. पाय मिठाच्या पाण्यात अर्ध्या तासांसाठी ठेवावे. नंतर पाय बाहेर काढल्यानंतर पाय नीट पुसून कोरडे करावे. बोटांच्या मधील जागासुद्धा नीट पुसून कोरडी करावी. मिठामध्ये अँटी-बॅक्टेरिअल असते, त्यामुळे इन्फ्केशन आणि सूज कमी होण्यास मदत होते, जळजळ होणं किंवा खाजेचा त्रासही कमी होतो.

तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा
टॉवेल, कपडे, साबण किंवा शूज यांसारख्या वैयक्तिक वस्तू कोणाच्याच वापरु नका आणि कुणाला वापरायला देऊ नका. कारण याच्यामुळे बुरशीजन्य संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याचा धोका जास्त वाढू शकतो.

पुरेसे पाणी प्या
सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. योग्य तो आहार घ्या. खनिजे समृद्ध आणि जीवनसत्त्वे आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते, यामुळे फंगल इन्फेक्शनपासून तुमचं शरीर प्रतिरोधक होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img