18.8 C
New York

Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी सांगितलं गुलाबी रंगाच्या जॅकेटचं रहस्य

Published:

लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला खास कामगिरी करता आली नाही. त्याच्या पक्षाने चार जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त एका जागेवर त्यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या सभेचा मंच, त्यांचे जॅकेट यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे. यावरच आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गुलाबी रंग

महाराष्ट्र सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. महिला मतदार आमच्याकडे याच योजनेच्या जोरावर आकर्षित होतील, महाविकास आघाडाली अशी सत्ताधारी आशा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आपापल्या सभेत महिलांविषयीच्या योजनांचा जास्तीत जास्त उल्लेख करताना दिसतायत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तर महिल मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. जास्तीत जास्त गुलाबी रंगाचा वापर अजित पवार यांच्या सभेत बॅनर्स, पोस्टर्स, मंच उभारणी यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हेदेखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले. याबाबतच पत्रकारांनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी त्यांच्या जॅकेटवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar अजित पवार नेमकं काय म्हणाले?

येथे प्रत्येकानेच वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत. मला कोणते कपडे परिधान करायचे? हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणच्या पैशाने मी माझे कपडे घेतो का? जे कपडे सामान्य माणूस घालतो, तेच कपडे मी परिधान करतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार तिसरी आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी चर्चा होती. यावर बोलताना या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही. एका कानाने ऐकतो एका कानाने सोडून देतो मी अशा गोष्टी , असे अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img