11.6 C
New York

Ravīndra Śobhaṇe : खा. रामशेठ ठाकूर हे साहित्यप्रेमी राजकारणी – डॉ रवींद्र शोभणे

Published:

रमेश औताडे, मुंबई

राजकारणात राहून साहित्यावर प्रेम करणारे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिवाळी अंक स्पर्धेच्या माध्यमातून दिवाळी अंकस एक लाखाचा प्रथम पुरस्कार देऊन एक मोठे कार्य केले आहेच. सोबत दिवाळी अंकाला या पुरस्काराच्या माध्यमातून आर्थिक हातभारही लावला आहे. त्यामुळे असे साहित्यप्रेमी राजकारणी महान व्यक्तिमत्त्व आहे. असे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन चे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे (Ravīndra Śobhaṇe) यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार सोहळ्यानिमित्त व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघ व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडला त्यावेळी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे बोलत होते.

यावेळी बोलताना मा.खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, काळ बदलत जात असताना दिवाळी अंक बदलत आहेत.चांगले चांगले दिवाळी अंक निघत आहेत. आता जास्तीत जास्त वेळ मी साहित्याला मोठे करण्यासाठी देत आहे. शाळा कॉलेज यांना आर्थिक मदत करत आहे.ताजमहाल जसा प्रसिद्ध आहे तसा मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध आहे. डिजिटल अंकास जे काही सहकार्य लागेल व त्यांना पुरस्कार देण्याचे ठाकूर यांनी सांगितले.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, वाढत्या महागाईत दिवाळी अंक काढण्याची कसरत खूप खर्चिक होत आहे. त्यासाठी सरकारदरबारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व संसदेत रामशेठ ठाकूर यांनी करावा. पुढील काळात पत्रकार संघ सर्व कार्यक्रमात पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट देणार आहे.

तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात दिवाळी अंक स्पर्धा अजून मोठ्या स्वरूपात कशी करता येईल यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे सांगितले. सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री नीरजा म्हणाल्या, भावनिक, पोटाची, बुध्दीची अशी भूक असते. मात्र बुध्दीची भूक मागे पडत आहे. साहित्य,नाटक, पुस्तके यासाठी उत्पन्नाच्या दोन टक्केही खर्च होत नसावा. भविष्यात वाचक आयात करावे लागतील.असे मत व्यक्त केले. पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी प्रस्ताव तर उपाध्यक्ष राजेंद्र हूंजे यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img