19.7 C
New York

Supriya Sule : शरद पवार आणि अजितदादांसमोरच नेत्यांची जुंपली; DPDC बैठकीत सुप्रिया सुळेंची कुणाशी खडाजंगी?

Published:

पुणे

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक सुरू आहे. या बैठकीत शरद पवारही (Sharad Pawar) सहभागी आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे देखील बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी निधी वाटपावरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. DPDC बैठकीत सुप्रिया सुळे–सुनील शेळकेंमध्ये (Sunil Shelke) जोरदार खडाजंगी झाली.

पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार सुनील शेळके आणि इतर आमदार उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपावर आक्षेप घेतला. आम्हाला न्याय मिळणार का? का फक्त मावळलाच निधी मिळणार. बारामती आणि शिरुरला निधी दिला जात नाही. मावळलाच निधी दिला जातो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

मावळला निधी दिला जातो. याचं स्वागत आहे. पण आम्हाला का दिला जात नाही? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. त्याला सुनील शेळके यांनी आक्षेप घेतला. ताई आम्ही बारामती बारामती करत नाही. तुम्ही सारख मावळचा उल्लेख करत आहात, असं प्रत्युत्तर सुनील शेळके यांनी दिलं. त्यावर आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का? असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, बऱ्याच महिन्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते एकत्र आले. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतरची या तिघांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात आहे. डीपीसीडीसीच्या बैठकीच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र आले. पण अजितदादा आणि शरद पवार यांच्यात संभाषणही झालं नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img