11.6 C
New York

Building Collapsed : मुंबईतील ग्रँड रोड येथे इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

Published:

मुंबई

मुंबईत (Mumbai) शनिवार पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे ग्रँट रोड (Grant Road) येथील एका इमारतीचा काही भाग कोसळला (Building Collapsed) असून त्या ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच ढिगाऱ्याखाली आणखीही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रँट रोड येथील रुबिनिसा मंझिल या इमारतीचा काही भाग शनिवारी सकाळी कोसळला. ही घटना घडल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून तात्काळ बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सात ते आठ जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तिघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img