19.7 C
New York

Ahilyanagar : ‘अहिल्यानगर’ नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल

Published:

मुबंई

औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादे धाराशिव नामांतर केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर (Ahmednagar) शहराचेही नामांतार अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर (Ahilyanagar) करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जुलैला याबाबत सुनावणी होणार आहे.

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून याची पहिलीच सुनावणी ही 25 जुलै रोजी होणार आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नावाची घोषणा केली होती.

त्यानंतर, अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकांनी देखील तसा ठरावं पाठवला होता. त्यामुळे राज्य सरकारने मंत्रिमंडळात अहिल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून सध्या हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान राज्यसरकारच्या या निर्णयाविरोधात आता जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने याबाबत न्यायालय काय निर्णय घेणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, सरकारची डोकेदु:खी या निर्णयामुळे वाढली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img