7.8 C
New York

Gautam Gambhir : ‘गौतम गंभीरने माझी मानसिकता बदलली’, असं का म्हणाले हर्षित राणा

Published:

निर्भयसिंह राणे

क्षमता ही समस्या नव्हती पण हर्षित राणाने (Harshit Rana) स्वतः कबुली दिली की, गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) आश्रयात येण्यापूर्वी आत्मविश्वासाच्या कमीशी संघर्ष केला आणि त्याला त्याच्या “भीती” चा सामना करण्यास भाग पाडले. पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेल्यानंतर 22 वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा सध्या आनंदात मग्न आहेत.

जगाला आपला आनंद जाहीर करण्यासाठी, त्याने इस्न्तग्रामवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तो आपल्या तितक्याच आनंदी वडिलांना उचलताना दिसत होता. पण जेव्हा त्याला आकार देणाऱ्यांना श्रेय द्यायचे झाले तेव्हा राणा स्पस्ट होते की “गौती भैय्या” नेहमीच “सर्वांच्या वर” असेल.

“दिल्ली में दिल टूट सकता है, पर हमने कभी हौसला नाहीं हारा (दिल्ली तुमचे हृदय तोडू शकते पण मी कधीही अशा सोडली नाही),” राणाने त्याच्या पहिल्या भारत कॉल-अपबद्दल जाणून घेतल्यानंतर सांगितले.माझा कठोर परिश्रम करण्यावर विश्वास हतोय, पण वयोगटातील संघात दुर्लक्ष केल्यावर जेव्हा मला दुखापत व्हायची, तेव्हा मी माझ्या खोलीत बसून रडायला लागायचो. माझे वडील प्रदीप राणा यांनी कधीही अशा सोडली नाही,” असे त्यांनी पीटीआयला (PTI) दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

हर्षितने ज्युनियर स्तरावर कठीण काळ वेळ सहन केला, ज्याने अनेकदा दुर्लक्ष केले, शेवटी त्याने ते करून दाखवले. या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयी मोहिमेमध्ये 19 विकेट्सचा एक उत्कृत्ष्ट IPL हंगाम होता.

IND vs PAK : महिला आशिया कप T20 लाईव्ह स्ट्रीमिंग: सामना कधी आणि कुठे?

“माझ्या ह्या सुंदर प्रवासात जर मला तीन लोकांची नवे घ्यायची असतील ज्यांचा मी ऋणी आहे, तर ते माझे वडील, माझे वैयक्तिक प्रशिक्षक अमित भांडारी सर ( माजी भारत आणि दिल्लीचे वेगवान गोलंदाज) आणि इतर सर्वांपेक्षा गौती भय्या (गौतम गंभीर), राणा म्हणाला. 2022 मध्ये राणाने चांगली सुरुवात केली होती, जेव्हा त्याने दिल्लीसाठी सात रणजी सामने खेळले आणि 28 विकेट्स मिळवल्या पण तेव्हापासून दुखापतींमुळे त्याला रेड-बॉलचे बरेच खेळ खेळायला नाही मिळाले. तरीही व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी 14 सामन्यात 22 आणि 25 T20 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या आहेत.

“नेहमीच एक नवीन दिवस असेल, नवीन सामना आणि गोष्टी आपल्या जागी पडतील. त्यासाठीच तुम्ही सर्व करता,” असे दिल्लीच्या प्लेयर्स अकादमी मध्ये अमित भंडारी आणि नारिंदर सिंग नेगी यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेतलेल्या हर्षित राणाने सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img