-0.8 C
New York

Tomato Price Hike : टोमॅटोचे भाव गगनाला भिडले

Published:

मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर १०० रुपये (Tomato Price Hike) किलोपर्यंत पोहोचले आहेत, कारण कमी पुरवठा आणि काढणीत अडथळा आणणाऱ्या पावसामुळे गेल्या आठवडाभरात देशभरातील सरासरी दर एक तृतीयांशने वाढले आहेत. एप्रिल-जून मधील तापमानाचा फटका टोमॅटोच्या उत्पादनाला बसला असून, गेल्या वर्षीच्या मान्सूनमुळे टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. उष्णतेमुळे वाढलेली नाशक्षमता हे टंचाईचे आणखी एक कारण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मपावसामुळे टोमॅटोची आवक ताणली गेली.

मुसळधार पावसामुळे काढणी आणि पुरवठा मंदावला आहे. ओखलासारख्या बाजारपेठेत उत्तम वाणांचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची आवक होत आहे, अशी माहिती टोमॅटो ट्रेडर्स असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी दिली. जूनमध्ये ग्राहक महागाई दर गेल्या वर्षीच्या तुलनेत चार महिन्यांच्या उच्चांकी ५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अस्थिर अन्न आणि इंधन वगळून कोअर इन्फ्लेशन ३.१ टक्क्यांपर्यंत घसरले असले, तरी अन्नधान्यमहागाई चिघळली आहे. महागाईचा वेग मंदावण्यामागे अन्नधान्यमहागाई हे मुख्य कारण आहे.

जूनमध्ये अन्नधान्यमहागाई वाढून ९.३६ टक्क्यांवर पोहोचली, त्यात भाजीपाला २९.३२ टक्के, कडधान्ये १६.०७ टक्के आणि तृणधान्याच्या किंमतीत ८.७५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि कर्नाटकातील कोलार या प्रमुख उत्पादक भागात पिकांची स्थिती चांगली असल्याने आठवडाभरात टोमॅटोचे दर घसरतील, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नुकतेच सांगितले.

विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Tomato Price Hike टोमॅटोचे भाव गगनाला भिडले

त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणातून कांदा आणि टोमॅटो जणू गायबच झाला आहे. एप्रिल-जून मधील तापमानाचा फटका टोमॅटोच्या उत्पादनाला बसला असून, गेल्या वर्षीच्या मान्सूनमुळे टोमॅटोचा (Tomato Price Hike) तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या 33 टक्क्यांनी वाढून टोमॅटोचा सरासरी भाव 80 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

Tomato Price Hike सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो गायब

काढणी आणि पुरवठा मुसळधार पावसामुळे (Tomato Price Hike) मंदावला आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत कोलार हा बहुतांश राज्यांचा एकमेव मोठा पुरवठादार आहे. ईशान्य भारतात देखील भाजी पाल्यांचे दर वाढल्याचं चित्र आहे.हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने टोमॅटो, बटाटा आणि कांद्याकडे मागणी वाढली आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, जूनमध्ये अन्नधान्यमहागाई वाढून 9.36 टक्क्यांवर पोहोचली. यामध्ये भाजीपाला 29.32 टक्के, कडधान्ये 16.07 टक्के आणि तृणधान्याच्या किंमतीत 8.75 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img