-0.8 C
New York

Satara : साताऱ्यात आज वाघनखांच्या दालनासह शस्त्र प्रदर्शनाचा भव्य सोहळा

Published:

लंडनहून साताऱ्यात (Satara) आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनखांचा भव्य सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पार पडणार आहे. यावेळी भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने शाहूनगरी शिवमय झाली आहे.

सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया ॲंड अल्बर्ट म्युझियममधून साताऱ्यात आणण्यात आली आहेत. आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजता वाघनखांचं दर्शन, वाघनखं ठेवण्यात आलेल्या दालनाचं उद्घाटन आणि शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी अनेक मंत्री आज सातारा दौऱ्यावर आहेत.

Satara शिवकालीन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं बुधवारी साताऱ्यात दाखल झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यात आली असून वाघनखांचं दर्शन आणि शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आज उ‌द्घाटन होत आहे. शनिवारपासून (२० जुलै) वाघनखं शिवप्रेमींना पाहता येतील.

शरद पवार गटाच्या वतीने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचा फुगा फोडला

Satara लंडनहून आणलेली वाघनखं खरी की खोटी?

लंडनहून आणण्यात आलेली वाघनखं ही खरी की खोटी, असल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वाघनखं खरी की खोटी, असा सवाल केला आहे. वाघनखं खरी नसतील तर तरूण पिढीवर नंतर काय परिणाम होईल, असंही सुळेंनी म्हटलं आहे. वाघनखांची वस्तुस्थिती सरकारने समोर आणण्याची मागणीही त्यांनी केलीय.

Satara संग्रहालयावर आकर्षक विद्युत रोषणाई

वाघनखं ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या वास्तूवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संग्रहालय परिसरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात दाखल झाल्यानंतर शिवतीर्थ ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img