नवी दिल्ली:
श्रीलंकेविरूद्धच्या आगामी तीन T20 आणि तीन एक दिवसीय (Team India) सामन्यांच्या मालिकांसाठी अजित आगरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीने दोन संघांची निवड करताना काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. आयसीसी T20 विश्वचषक भारताला दुसऱ्यांदा मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने क्रिकेटच्या तिसऱ्या प्रकारातून माघार घेतल्यामुळे त्याचे जागी सूर्यकुमार यादवची T20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करताना हार्दिक पंड्याला डावलले आहे. हार्दिक पंड्याला याच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली होती. भारतीय संघांच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गौतम गंभीर यांचा हा पहिलाच दौरा असेल.
झिम्बाब्वे विरूद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडसह अभिषेक शर्मालाही वगळण्यात आले आहे. सलामीचा फलंदाज शुभमन गिलकडे दोनही संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे एक दिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माच संघाचा कर्णधार असणार आहे. विराट कोहली या मालिकेसाठी उपलब्ध आहे. T20 विश्वचषक गाजवलेल्या तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
ह्या वेगवान गोलंदाजाचे होतय टीम इंडियात पुनरागमन ?
सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे,रिंकू सिग आणि रियान पराग यानी भारतीय संघातील आपले स्थान कायम राखले आहे. या सर्वांचा झिम्बाब्वे विरूद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होती. बीसीसीआयच्या वार्षिक कराराच्या यादीतून वगळलेल्या श्रेयस अय्यरला एक दिवसीय संघात स्थान मिळाले आहे. महम्मद सिराज,अक्षर पटेल यांचा T20 संघात समावेश करण्यात आला आहे.
T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार,) शुभमन गिल (उप-कर्णधार ), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत,संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर,रवी बिश्नोई,अर्शदीप सिंग, खलील अहमद,महम्मद सिराज
एक दिवसीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल( उप-कर्णधार), विराट कोहली l, लोकेश राहूल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, महम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग,रियान पराग,अक्षर पटेल,खलील अहमद, हर्षीत राणा