3.6 C
New York

Sharad Pawar : निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा

Published:

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. विधानसभेत याचा फायदा शरद पवार गटाला होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या तक्रारीची दाद घेऊन अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेलं पिपाणी चिन्ह गोठवलं आहे. लोकसभेत या पिपाणी चिन्हाचा शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलेल्या तुतारी चिन्हाला विरोधकांनी पिपाणी दाखवून चांगलेच आव्हान दिले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत तुतारीचा प्रभाव कमी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता विरोधकांची ‘पिपाणी’वाजणे ‘बंद’ झाले आहे. शरद पवार गटाची तुतारी आणि अपक्ष उमेदवारांची पिपाणी ही दोन्ही चिन्हे सामान्यतः ‘तुतारी’ म्हणून ओळखली जातात, असा उल्लेख पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता.

अजितदादांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेट मागचं काय आहे रहस्य ?

लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं शरद पवार गटाने म्हटलं होते. लोकसभेची निवडणूक पक्षाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे शरद पवार गटाचा सातारा लोकसभेत पराभव झाला.

ग्रामीण भागात तुतारी व पिपाणी यात फरक कळला नाही. त्यामुळे बीड लोकसभेत पिपाणी चिन्हावरही भरभरुन मतदान झाल्याचे मतमोजणीच्या आकड्यांवरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img