Reel Star Aanvi Kamdar: अन्वी कामदार (Aanvi Kamdar) म्हणून प्रसिद्ध ‘रील स्टार’ आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असणारी तरुणी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार ही मुंबईमधलीच रहिवासी आहे. अन्वी ही तिच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत रायगड मधल्या माणगाव येथे गेली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर गेला होता. मात्र त्यावेळीच तिचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला. २७ वर्षीय अन्वी कामदार ही उच्च शिक्षित होती, अन्वीने CA केलं होत. तिच्या अचानक आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांनाच मोठा धक्का बसला असून सगळीकडेच खळबळ माजली आहे.
Reel Star Aanvi Kamdar: अन्वी कामदार आणि तिच्या सात मित्रांचा ग्रुप बाहेर फिरायला गेला होता. तिथे एका कानाकोपऱ्याच्या कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती. मात्र, तेवढ्यात तिचा तोल गेला अन् ती पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी तिच्यासोबत तिचे सहा मित्र-मैत्रिणी देखील होते. पण, अन्वीला या धोक्याबद्धल कोणालाच सूचना देता आली नाही. ही घटना झाल्यानंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. तेव्हाच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहीम सुरु केली. दरी ३०० फूट खोल असल्या कारणाने बचाव कार्यात अडथळा येत होता. त्यांनतर तब्बल ६ तासांच्या शोधांनंतर अन्वीला बाहेर काढण्यात आलं. अन्वीला बाहेर काढल्यानांतर ती गंभीर जखमी झाली होती. तात्काळ तिला माणगाव उपजिल्हा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं.
विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात हायकोर्टाचा मोठा निर्णय
Reel Star Aanvi Kamdar: इन्फ्लुएन्सर आणि रिल्स स्टार अन्वी कामदार हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर माणगाव मधील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांनी पर्यटक व आसपासच्या लोकांना आवाहन केलं आहे. लोकांनी पर्यटनाचा आनंद जबाबदारीनं घ्यावा. प्रवास करताना पहिलं सुरक्षिततेला प्राधान्य द्या. पर्यटनस्थळी धोकादायक वर्तन करणं टाळावे, अशा सूचना देऊन लोकांना सुरक्षित राहण्याचं व स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
रील बनवण्याच्या नादात अनेकजण आपला जीव गमावतात. अशीच घटना अन्वीसोबत घडली आहे. एखादा रील व्हिडिओ करण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत, आपला जीव अतिशय धोक्यात टाकून जोखीम पत्करतात. याआधी पुण्यामध्ये एक तरुणी मित्राच्या हाताच्या साहाय्याने काही दिवसांपूर्वी एका बिल्डिंगच्या खाली लटकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.