11.6 C
New York

Prasad Lad : उद्योग व्यवसायासाठी एमसीसीच्या कार्यशाळेत सहभागी व्हा – प्रसाद लाड

Published:

रमेश औताडे, मुंबई

मराठी माणूस उद्योग व्यवसाय करण्यासाठी कुठे कमी पडतो. त्याला नेमके कशाचे पाठबळ मिळाले पाहिजे यासाठी गेल्या 44 वर्षापासून मराठी मातृभाषा असणाऱ्या माणसाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी मराठी चेंबर सहकार्य करत आहे. आता त्यांनी एका कार्यशाळेचे आयोजन केले असून त्या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन उद्योजक आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केले.

दादर येथे स्वातंत्रवीर सावरकर सभागृह येथे गुरुवारी “यशार्थ” या मराठी माणसाला उद्योजक करण्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. यावेळी उद्योजक संतोष पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर जागतिक दर्जाचे व्यवसाय मार्गदर्शक सचिन कामत यांनी वर्षभर कार्यशाळा नेमके काय काय शिकवणार आहे याची माहिती दिली.

या संस्थेने १३ महिन्याचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी आवश्यक माहितीचा खजिना फक्त ३५०० रुपयात उपलब्ध केला आहे. प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी प्रत्येकी तीन तासांचे एक सत्र आयोजित केले जाणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर स्मारक सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे एकूण ३९ तासांचे मार्गदर्शन होईल. पहिल्या तुकडीत फक्त १०० जणांना प्रवेश मिळतील असे चेंबर चे अध्यक्ष मनोहर पेडणेकर यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण,स्वाती घोसाळकर, विवेक गद्रे, स्वप्नील राणे, निलेश कारंजे, राजन चौलकर, महेश बापट,मेहुल माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img