8.7 C
New York

Heavy Rain : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Published:

राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरला आहे. (Heavy Rain) गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता राज्यात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच रेड अलर्ट राज्यातील सहा जिल्ह्यांना जारी केला आहे. या जिल्ह्यांना रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया रेड अलर्ट दिला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Heavy Rain मुंबईत संततधार पाऊस, पुण्यातही अलर्ट

गुरुवारपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या मरबार हिल परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नीट परीक्षेचा केंद्र व शहरनिहाय निकाल लावा सुप्रीम काेर्टाचे आदेश

Heavy Rain मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

दरम्यान, मुंबईसह राज्यातील ठाणे, पालघर, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Heavy Rain मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत सध्या जोरदजार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस असल्यामुळं अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरले आहे. त्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये देखील पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यासोबत पोलीस आणि पालिकेचा लाईफ गार्ड यांचा अंधेरी सबवे बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img