23.1 C
New York

Navara maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार मोठा ट्विस्ट!

Published:

Navara maza Navsacha 2: मराठी कलाविश्वातील ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Majha Navsacha) हा चित्रपट एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. या चित्रपटातील सगळी गाणीसुद्धा हिट ठरली होती. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. तर आता तब्बल २० वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Majha Navsacha २) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अशातच आता या चित्रपटाची एक मोठी अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळतंय.

Navara maza Navsacha 2: दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, विजय पाटकर, सुनील तावडे, अशी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाची स्टारकास्ट होती. या चित्रपटात अशोक सराफ यांनी लालू कंडक्टर अशी अतिशय सुंदररित्या भूमिका साकारली होती. अशोक सराफ यांची ही साकारलेली भूमिका प्रेक्षकांना भावली. मात्र, आता लालू कंडक्टर हे ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार नाहीयेत. आता आवडत्या चित्रपटाच्या प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अशोक सराफ तर दिसणार आहेत. मात्र, लालू कंडक्टर अशी भूमिका साकारताना दिसणार नाही आहेत.

Navara maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचा एक प्रोमो समोर आला आहे. या चित्रपटातला अशोक सराफ यांचा पहिला लूक या प्रोमोमधून प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ लालू कंडक्टर दिसत नसून ‘टीसी’ च्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये लालू कंडक्टरने अतिशय धमाल आणली होती. आता मात्र ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये टीसी बनलेला लालू काय धुमाकूळ घालतो, हे पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. ‘लालू -प्रसाद’ अशी अशोक सराफ आणि विनोद तावडे यांची जोडी ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये प्रचंड हिट ठरली होती. येण्याऱ्या सीक्वलमध्ये अशोक सराफ तर टीसी झालेत मात्र विनोद तावडे यामध्ये दिसणार का? याबद्धलची अद्याप कोणतीच अपडेट अजून समोर आलेली नाहीये. ‘नवरा माझा नवसाचा’ २ हा चित्रपट रिलीज कधी होणार याची तारीख उद्या कळणार आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण!

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img