21 C
New York

Mega Block : मध्य रेल्वेवर कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री मेगाब्लॉक

Published:

मुंबई

मध्य रेल्वेने (Central Railway) कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेतले. विशेष मेगाब्लॉकदरम्यान (Mega Block), मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी (CSMT Railway Stations) आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत धावतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच वडाळ्याहून पनवेलच्या दिशेने धावतील.

मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे चार तासांसाठी भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा ते सीएसएमटी लोकल बंद ठेवण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकलसेवेसह अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे. कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरील हा मेगाब्लॉक शनिवारी रात्री उशिरा सुरु होणार आहे. रात्री 12.30 पासून ते रविवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकलसेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत, तसेच या स्थानकातून पनवेलच्या दिशेने लोकल चालविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

शनिवारी मध्यरात्री सीएसएमटीवरुन कसारासाठी शेवटची लोकल 12.14 वाजता असेल. तर शनिवारी रात्री कल्याणवरुन CSMT साठी शेवटची लोकल 10.34 वाजता सुटेल. तसेच शनिवारी मध्यरात्री 12.13 वाजता सीएसएमटी ते पनवेल ही शेवटची लोकल सोडण्यात येईल. तर शनिवारी रात्री 10.46 वाजता पनवेलवरुन सीएसएमटीसाठी शेवटची लोकल सुटेल.

हार्बर मार्गावर रविवारी पहाटे 4.47 वाजता सीएसएमटीवरुव कर्जतसाठी पहिली लोकल सुटेल. तर रविवारी पहाटे 4.00 वाजता ठाणे ते सीएसएमटी पहिली लोकल धावेल.त्याचबरोबर रविवारी पहाटे 4.52 वाजता सीएसएमटीवरुन ते पनवेलसाठी पहिली लोकल धावेल. त्याचबरोबर रविवारी पहाटे 4.17 वाजता वांद्रे ते सीएसएमटी ही पहिली लोकल असणार आहे. या वेळापत्रकाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दादरपर्यंत चालविल्या जाणाऱ्या एक्सप्रेस…
12870 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस
11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
12052 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस
22120 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस
11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img