Monsoon Skin Care: वर्षातल्या तिन्ही ऋतूमध्ये आपण शरीराची काळजी घेत असतो. तसंच पावसाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. आता दमट वातावरणामुळे काहींची त्वचा कोरडी तर काहींची त्वचा ही तेलकट होते. यामुळेच पावसाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी महिला पहिल्या पार्लरमध्ये धाव घेतात. अगदी महागडे फेशिअल करूनसुद्धा त्यांची त्वचा मऊ-मुलायम होत नाही. यासाठीच तुम्ही पावसामध्ये पार्लरला जाण्यापेक्षा घरच्या घरीच काही पदार्थापासून नॅचरल फेस मास्क तयार करू शकता. ज्यामुळे पावसात तुमच्या त्वचेचे पोत सुधारतील आणि त्वचा सुद्धा हायड्रेट राहण्यास मदत होईल.
कोरफड
Monsoon Skin Care: कोरफड ही औषधी वनस्पती आहे. कोरफडला आयुर्वेदात मोठं महत्व आहे. कोरफडचं फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यामधे कोरफड जेल, थोडासा लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्या. चेहऱ्यावर हा फेस मास्क घेऊन चांगला मसाज करा. या फेशिअलमुळे त्वचेला चांगला ग्लो येतो आणि त्वचा मॉइश्चरायझर होते.
पपई
Monsoon Skin Care: पपई ही आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यास पपईतील पोषक घटक मदत करतात. पपईमधले फेस मास्क बनवण्यासाठी सर्वात पहिलं एका भांड्यामधे पपईचा गर काढा. त्यामध्ये दही, कोरफडचा गर आणि गुलाब पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाली की, चेहऱ्यावर, मानेवर आणि हाता-पायाला लावून छान मसाज करा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा पाण्याने वॉश करा. ही प्रक्रिया झाली की, २ ते ३ बर्फ चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर थोडासा थंडावा येईल. पावसाळ्यामध्ये तुमची त्वचा तेलकट जास्त होत असल्यास तुमच्यासाठी खास रामबाण उपाय असेल. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील.
दररोज प्या एक ग्लास धण्याचं पाणी तर शरीराला मिळतील ‘हे’ ५ फायदे
दुधाची साय
काहींना दुधाची साय खायला आवडते. पण हीच दुधाची साय शरीरासोबतच त्वचेसाठी पण फायदेशीर आहे. दुधातले पोषक घटक त्वचेचे तारुण्य जपण्यासाठी मदत करतात. पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचेवर होणारे वाईट परिणाम दिसून येतात. अशावेळी तुम्ही दुधाच्या सायपासून फेशिअल करू शकता. याचे फेस मास्क बनवण्यासाठी दुधाची ताजी साय एका भांड्यात काढून त्यामध्ये चिमूटभर हळद घ्या. हे मिश्रण एकजीव करून २० ते २५ मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करा. दुधाच्या सायमुळे त्वचा मुलायम आणि चमकीली होते. तसंच चेहऱ्यावरील येणाऱ्या फोड्यांची संख्या कमी होते.
मुलतानी माती
काहींच्या चेहऱ्यावर तेलकटपणा खूप येतो. त्यासाठी मुलतानी माती ही खूप फायदेशीर आहे. त्वचेवर तेल निर्मिती करणाऱ्या ग्रंथी नियंत्रणात आणण्याचं काम मुलतानी माती करते. त्याने त्वचेवरचं अतिरिक्त तेल निघून जातं. मुलतानी मातीच फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात मुलतानी माती घ्या, थोडस गुलाब पाणी घ्या, त्यात हळद टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करा. हा फेस पॅक रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने वॉश करा. पावसाळ्यात होणारी कोरडी त्वचा मुलायम होते.