23.1 C
New York

Dombivli : आमदाराचा भाचा सांगून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्याला बेड्या

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

कल्याण, भिवंडी, ठाणे व मुंबई येथे आमदाराचा भाचा असल्याचे सांगुन अनेकांची फसवणूक करणाऱ्याला डोंबिवली (Dombivli) विष्णूनगर पोलिसांनी विजय तांबे (Vijay Tambe) या भामट्याला नवी मुंबई (Navi Mumbai) खारघरहून अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय दत्ताराम तांबे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ठाणे शहर आणि मुंबई येथे विजय विरोधात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. विजयने आमदाराचा भाचा असल्याचे सांगून त्याच्या साथीदारासह अनेकांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर यांनी करत आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, कल्याण परिमंडळ -3 चे पोलीस उपआयुक्त संजय गुंजाळ, सहायकपोलीस आयुक्त कल्याणजी घेटे. यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरीक्षक संजय पवार, पोनि गहीनीनाथ गमे, सपोनिरी लोखेडे, पोउपनिरी भवर, पोहवा पाटणकर, पोहवा पाटील, पोहवा मोरे, पोहवा जमादार, पोहवा भोसले, पोशि रायसिंग, पोशि साबळे, पोशि भाबड यांनी बजावली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img