10.3 C
New York

Regional Party : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पवार, ठाकरेंचा पक्षाला प्रादेशिक दर्जा

Published:

नवी दिल्ली

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commissions) मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यांच्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून या पक्षाला देखील आता प्रादेशिक पक्षाचा (Regional Party) दर्जा देण्यात आला आहे.

पुढील काही महिन्यात महाराष्ट्रमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या पक्षाला नाव आणि चिन्हासाठी लढा द्यावा लागला होता. त्यानंतर या पक्षांना चिन्ह मिळालं तर आता निवडणूक आयोगाकडून या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मातांची संख्या लक्षात घेतली जाते यासाठी 1968 चा पक्षचिन्हाने पक्षाच्या नियमांचा निकष ग्राह्य धरला जातो. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र झटका बसला आहे. कारण या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. तर यामध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img