26.6 C
New York

Google Pixel 9 Pro Fold : ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, कंपनीने शेअर केली पहिली झलक

Published:

निर्भयसिंह राणे

Google ने अखेर बहुप्रतीक्षित Google Pixel 9 Pro Fold आणि Pixel 9 Pro च्या तपशिलांचे अनावरण केले आहे. X वर पोस्ट करत, Google ने आगामी फ्लॅगशीप स्मार्टफोन्सचे अधिकृत पोस्टर पोस्ट केले. टिझर या उपकरणांमध्ये त्याच्या Gemini AI चे एकत्रीकरण दर्शवते. टेक जायंट Google ने 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या Google इव्हेन्टची टाइमलाईन देखील जरी केली आहे. हा कार्यक्रम भारतात सकाळी 10AM PT, म्हणजे 10:30PM वाजता लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. ही माहिती वगळता, Google ने आगामी स्मार्टफोनबद्दल इतर कोणतीही माहिती दिली नाही. तथापि, अशा अनेक अफवा आणि लीक आहेत ज्या ऑनलाईन दिसत आहेत.

Google Pixel 9 Pro Fold
अधिकृत टिझर ड्युअल-पिल आकाराचे कॅमेरा कटआऊटसह एक जबरदस्त डिझाईन दर्शवतो. कॅमेरे मागील पॅनेलच्या वरच्या-डाव्या बाजूला एका चौकोनी आयलंडवर बनवले आहे. जरी टिझरमध्ये इनर डिस्प्ले कॅमेरा दाखवला नसला तरी, अफवा सूचित करतात की फोने स्क्रीनच्या डाव्या बाजूला पंच-होल कॅमेरा असेल, जे पहिल्या फोल्डचा एक डिझाईन उपग्रडे असेल.

Makeup Mistakes: सावधान! मेकअप करताना ‘या’ चुका तुम्हीही करता? चेहऱ्याचा नक्षा बिघडू शकतो

Google Pixel 9 Pro Fold, Obsidian आणि Porcelain कलर मध्ये उपलब्ध असू शकतो. या फोल्ड फोन्सची किंमत 256GB मॉडेलसाठी EUR 1,899 (अंदाजे ₹1,68,900) आणि 512GB मॉडेलसाठी EUR 2,029 (अंदाजे ₹1,80,500) अपेक्षित आहे.

नवीन आगामी Google फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या इतर वैशिष्ठ्यांची पृष्ठीकरण्यासाठी आणि तपशिलांसाठी, आपल्याला 13 ऑगस्ट रोजी Google च्या इव्हेन्टची प्रतीक्षा करावी लागेल. लाँच दरम्यान, Google Pixel Watch 3 चे अनावरण करेल अशी अपेक्षा आहे आणि अजून टेक प्रोडक्टसच ही अनावरण होऊ शकत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img