-0.8 C
New York

Microsoft Server Issues : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड

Published:

मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील हवाई सेवा (Microsoft Server Issues) प्रभावित झाली आहे. भारतातील स्पाइसजेटने ट्विटरवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की,’त्यांच्या सेवा प्रदात्यासह तांत्रिक आव्हाने अनुभवत आहेत, ज्यामुळे बुकिंग, चेक-इन आणि बुकिंग कार्यक्षमता यासह ऑनलाइन सेवांवर परिणाम होत आहे. या कारणास्तव, स्पाइस जेटने विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया सुरू केल्या आहे, अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतून अशाच प्रकारच्या समस्या आल्या आहेत.’

दरम्यान, या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. मुंबई विमानतळ आणि गोवा विमातळावर सर्व्ह ठप्प झाल्याची बातमी आली आहे. तसेच मुंबई विमानतळावर चेक इन सिस्टिम ठप्प झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आकासा एअरने सेवा ठप्प झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पाइसजेड आणि इंडिगेकडूनही अशी तांत्रिक अडचण येत असल्याचे म्हटले आहे. सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म क्राऊडस्ट्राइकमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे सेवा बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बहुतांश युझर्स याबाबत तक्रार करत आहेत. या अडचणीमुळे लाखो युझर्सना फटका बसला आहे. अनेक युझर्स त्यांच्याकडे सिस्टिम शटडाऊन झाल्याची किंवा त्यांना ब्लू स्क्रीनची अडचण येत असल्याची तक्रार करत आहे. याचा फटका मुख्य बँका, इंटरनॅशनल एअरलाइन्स, जीमेल, अॅमेझॉन आणि इतर अत्यावश्यक सेवांना फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्येही बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आऊटलेट आणि एअरलाइन्सची सेवा प्रभावित झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर यांनी सांगितले की, देशात शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणावार कंपन्यांच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Microsoft Server Issues यूएस फ्रंटियर एअरलाइन्सला सर्वाधिक फटका बसला आहे

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे अमेरिकेच्या फ्रंटियर एअरलाइन्सला सर्वाधिक फटका बसला आहे. फ्रंटियर एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की सर्व्हरच्या समस्येमुळे 131 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 200 हून अधिक उड्डाणे उशीर झाली आहेत.

या सर्व्हर डाऊनचा दिल्ली आणि मुंबई सह देशातील सहा विमानतळांना फटका बसला आहे. या संदर्भात सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. प्रवाशांनी वेळेपूर्वी दोन तास विमानतळावर येण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जगभरातील जवळपास २ हजारे उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. यासंदर्भात कंपनीकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही यावर काम करत असून निराकरण करण्यासाठी अनेक टीम बोलावल्या आहेत. आम्हाला बिघाडही सापडला आहे, असं मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img