निर्भयसिंह राणे
मायक्रोसॉफ्ट (Microsoft) विंडोजची सेवा बंद पडल्याने ब्रिटन, अमेरिका, जर्मनीसह जगातील अनेक देशांमध्ये याचा परिणाम दिसून आला. मायक्रोसॉफ्टची सेवा बंद पडल्याने डिजिटल व्यवहार ते उड्डाण सेवेवर देखील परिणाम दिसून आला आहे. स्पेसएक्सचे मालक एलोन मास्कने (Elon Musk) अनेकदा अशा परिस्थितीवर त्याच्या प्रतिस्पर्धी ब्रँडची खिल्ली उडवून त्यांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच मायक्रोसॉफ्ट ग्लोबल आउटेज जगभरात पसरले आहे. बिघडलेल्या उपकरणांपासून ते उड्डाण सेवेपर्यंत, याचा परिणाम जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोकांवर झाला आहे.
भूतकाळात जर आपण पहिला तर हा अलीकडचा सर्वात मोठा टेक फियास्को आहे आणि यात मेटा आणि त्याच्या प्लॅटफॉर्मलासुद्धा भूतकाळातील आउटेजचा समावेश आहे. या वेळी पुन्हा एलोन मास्कने, त्याच्या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ह्या प्रकरणावर माहिती देताना, मस्कने त्यांची एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली ज्यात त्यांनी मायक्रोसॉफ्टची खिल्ली उडवली आणि त्याला ‘मायक्रोहार्ड’ म्हणाले होते.
तत्पूर्वी, या प्रकरणावरील दुसऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, मस्कने मागील पोस्टवर हसणारा इमोजी पोस्ट करून मॅक्रोसॉफ्टची प्रचंड खिल्ली उडवली. मूळ पोस्टनेच, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या क्लाउड सेवा Azure क्रॅश झाल्याचे एक मिम बनवून सांगितले की हे सर्व असताना सुद्धा मस्कचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चालू होते.
Joe Biden : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडन घेणार माघार
शुक्रवारी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे जगभरातील एअरलाइन्स, टीव्ही टेलिकास्ट, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये 1 हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आणि 3 हजार विमाने उशिराने उडाली. भारतात, इंडिगो, स्पाईसजेट, आकासा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस या 5 एअरलाइन्सने या तांत्रिक समस्येमुळे त्यांचे बुकिंग, चेक-इन आणि फ्लाइट अपडेट सेवा प्रभावित झाल्याचे कळवले आहे. विमानतळावर सेवा मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.