3 C
New York

Vasant More : वसंत मोरेंना कुणी दिली जीवे मारण्याची धमकी?, ऑडिओ क्लिप व्हायरल

Published:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुण्यातील फायर ब्रँड नेते तथा माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat ) मिळाली आहे. वसंत मोरे यांच्या भाज्याच्या मोबाईल ऑडिओ क्लिप द्वारे धमकी मिळाली आहे. मुळे एकच खळबळ उडाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांने धमकी दिल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी वंसत मोरे यांनी केली आहे. 

वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर याला एका अज्ञात मनसे कार्यकर्त्याने फोन केला. या फोनमध्ये कथित मनसे कार्यकर्त्याने आपण या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वसंत मोरे यांची विकेट पाडणार, अशी धमकी दिली आहे. तू माझी पोलीस ठाण्यात तक्रार कर. माझ्यावर आधीच 13 ते 14 तक्रारी आहेत. आणखी एक होईल. मला काही फरक पडत नाही. वेळ पडली तर मी एखाद वर्ष आतमध्ये जाईन. पण मी वसंत मोरेची विकेट पाडणार म्हणजे पाडणार. मी मनसेचा कार्यकर्ता आहे. मनसेचं काम करतो असं धमकी देणारा व्यक्ती म्हणतो.

वसंत मोरे यांनी अनेक वर्ष मनसे पक्षात काम केलं. ते पुण्याचे माजी नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत गटबाजीला वैतागून पक्षाला रामराम ठोकला होता. वसंत मोरे यांनी अनेकदा आपली खदखद व्यक्त केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला होता. राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांचे मनधरणीचे प्रयत्न केले होते. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

वसंत मोरे यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं की, मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला की मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे. पाहू पोलीस आता यावर काय भूमिका घेतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img