सोलापुरमध्ये भरधाव (Solapur News) एसटी बस उलटल्याची घटना समोर आलीय. एसटी बसचा चालकाला फिट आल्यामुळे भीषण अपघात झालाय. सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे भरधाव वेगात असलेली एसटी बस पलटी झाली अन् रस्त्याखाली जावून कोसळल्याचं समोर आलंय. यावेळी चालकाला केबिनवरच सीपीआर दिल्याची माहिती मिळत आहे. टेंभुर्णी – कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एसटीला अपघात झाला आहे. या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली.
Solapur News दैव बलवत्तर म्हणून चालकासह सर्वजण सुखरुप बचावले
एसटी चालकाला फीट आल्यामुळे बस शेतात घुसली. पिंपळनेर नजीक आल्यानंतर एसटी चालकाला फीट आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही बस रस्ता सोडून कडेला गेली.. चालकाला काही सुचण्याच्या आधीच ती थेट शेतात घुसली थोड्या अंतरावर गेल्यानंतर एसटी उलटली. या प्रकारामुळे एसटीत असलेले प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते. या एसटीबसमध्ये ३५ ते ४० प्रवासीकरत असल्याची माहिती मिळतेय.
विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात हायकोर्टाचा मोठा निर्णय
Solapur News भरधाव बस उलटली
एसटी पलटी झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव (Solapur News) घेतली. प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आलं. बसमधील काही प्रवासी या अपघातात जखमी झाले होते. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यामुळे कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलंय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. ही घटना आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात घडलेली आहे.
Solapur News प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ
धावती बस अचानक उलटल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला (Solapur Accident) होता. भीतीमुळे प्रवाशांमध्ये आरडोओरडा निर्माण झाला होता. स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु बसचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत (Accident News) आहे. एसटी ड्रायव्हरला अचानक फीट आल्यामुळे बस पलटी झाल्याची घटना घडलीय.