10.8 C
New York

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरला विषबाधा?

Published:

Janhvi Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) तब्बेत बिघडली आहे. त्यामुळे जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चेन्नईहून मुंबईला परतताना जान्हवीची प्रकृती बिघडली आहे, त्यांनतर तिला मुंबईमधल्या एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी ही माहिती दिली आहे. बोनी कपूर यांनी म्हंटल की, चेन्नईतून मुंबईला परत येताना तिची प्रकृती बिघडली त्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलं.

Janhvi Kapoor: एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जान्हवी चेन्नईला गेली होती. त्यांनतर मुंबईला परतली. त्या दरम्यान तिच्या खाण्यामध्ये काही पदार्थ आला असावा त्याच्यामुळे तिला फूड पॉयझनिंग झालं. त्यांनतर जान्हवी कपूरला तातडीने हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. विमानतळावर तिने काही तरी पदार्थ खाल्ला त्यातून तिला विषबाधा झाली. कारण त्यानंतरच तिची प्रकृती बिघडली आहे. दिलेल्या माहितीनुसार, आता तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे असं बोनी कपूर यांनी सांगितलं आहे.

‘अशी ही बनवाबनवी’चा सीक्वेल येणार परत? सचिन पिळगावकर म्हणाले, “लक्ष्याशिवाय…”

Janhvi Kapoor: बुधवारीच जान्हवी कपूरला अशक्तपणा जाणवत होता. त्यांनतर तिला गुरुवारीही त्याचा त्रास होऊ लागला. मग नंतर तिला एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शुक्रवारपर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ग मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यात जान्हवी कपूर शूटिंगमध्ये व्यस्त होती. तसंच, मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला सुद्धा जान्हवीने हजेरी लावली होती. ‘उलझ’ या चित्रपटामुळे जान्हवी सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात ती आयएफस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘उलझ’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला होता.

जान्हवी कपूर ही प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर (Bony Kapoor) आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) यांची मुलगी आहे. जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट ‘धडक’ होता. हा चित्रपट मराठीतला ‘सैराट’ याचा रिमेक होता. हा चित्रपट येणार म्हणून श्रीदेवीला प्रचंड उत्सुकता होती. मात्र, लेकीचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच श्रीदेवीचं निधन झालं. त्यांनतर जान्हवीने विविध वेब सिरीज आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होत. नुकतीच ती अनंत आणि राधिका यांच्या लग्नात दिसली होती. आता फूड पॉयझनिंग झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img