8.3 C
New York

BJP : भाजपचं ठरलं, आता विरोधकांना सुट्टी नाही, नेत्यांची टीम तैनात

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्याने आता भाजपकडून ताकही फुंकून पिले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करता भाजपने (BJP) कंबर कसली आहे. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देण्याकरिता भाजपच्या वतीने दहा प्रमुख नेत्यांच्या दोन टीम बनवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) काळात विरोधकांनी भाजपाविरोधात केलेल्या प्रचाराचा फटका लक्षात घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आता भाजपाकडून पक्षातील काही नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने आतापासूनच भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. येत्या काळात विरोधकांना सुट्टी न देता प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर देशात भाजपाची पुन्हा सत्ता आलेली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील निकालांमुळेभाजपा आनंदी नसल्याचेच पाहायला मिळत आहे. देशात एनडीएची सत्ता आली असली तरी भाजपाचे 400 पारचे स्वप्न मात्र भंग झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले आहे. तर महाराष्ट्रात भाजपाची अत्यंत वाईट अवस्था लोकसभा निवडणुकीत झालेली पाहायला मिळाली. कारण भाजपाला लोकसभेत मुंबईत केवळ 9 जागांवर यश मिळवता आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकांवर भाजपाच्या प्रवक्त्यांकडून तर उत्तर देण्यात येतेच. पण त्याचा फारसा काही परिणाम होत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपाने 10 फायर ब्रॅंड नेत्यांची निवड केली आहे. या नेत्यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे.

भाजपाने रोज सकाळी 9 वाजता विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर केली आहे. यामध्ये नवनिर्वाचित विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. तर, संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपाकडून सहा जणांच्या टीमची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, विभागानुसार पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि त्याबाबत बोलण्यासाठी भाजपाने 20 नेत्यांची निवड केली आहे. भाजपाच्या विभागीय टीममध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img