3.6 C
New York

Assembly Elections : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू

Published:

मुंबई

राज्यातील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असून काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या उपस्थितीत मुंबईत आज बैठक सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पुढील भूमिका काय असणार आहे. या संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकी करता दिल्लीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, खा. इम्रान प्रतापगडी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, आ. अमिन पटेल, आ. यशोमती ठाकूर, खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, के. सी. पाडवी, सुनिल केदार, अस्लम शेख, डॉ. विश्वजीत कदम, भाई जगताप, चरणसिंग सर्रास, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, AICC सचिव संजय दत्त, हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, आशिष दुआ, संपत कुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img