3.1 C
New York

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण!

Published:

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour: बॉलीवूड्चे सेलिब्रिटी दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा भाग बनलेले असतात. गेल्या काही काळापासून बच्चन कुटुंबाची चर्चा चांगलीच रंगली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळं होणार असून दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. आता असंच काहीतरी घडलंय, अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधी एका पोस्टला सोशल मीडियावर लाईक केल्याने या चर्चांमध्ये चांगलीच भर पडली आहे.

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour: सोशल मीडियावर हिना खंडेलवाल यांनी घटस्फोटासंबंधी एक पोस्ट शेअर केली होती. ज्या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटल होत की, ज्यावेळी प्रेम करणं सोप्प राहत नाही, त्यावेळी लग्न केलेली जोडपी ही विभक्त होतात. त्यांच्या या घटस्फोटाला कोणते घटक कारणीभूत ठरतात त्यानंतर वयाच्या ५० व्या वर्षांनंतर काडीमोड होण्याचे प्रमाण का वाढत आहे? या पोस्टमध्ये असा आशय होता.

अभिनेत्री जान्हवी कपूरला विषबाधा?

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour: यासोबतच त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, घटस्फोट घेणं कोणत्याही व्यक्तीसाठी सोप्प नसतं. म्हातारपणामध्ये आपल्या जोडीदाराचा हात हातात घेऊन रास्ता पार करण्याचे स्वप्न कोणती व्यक्ती पाहत नाही? मात्र, आयुष्य हे आपण जसा विचार करतो तसंच असत नाही. बरीच वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर लोक कसे काय वेगळ होण्याचा विचार करतात? आयुष्यातले अनेक महत्वाचे क्षण एकमेकांसोबत घालवल्यानंतर, बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहिल्यांनंतर ते एकमेकांपासून कसे वेगळे होतात? आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींमुळे ते एकत्र राहतात आणि कोणत्या समस्यांचा सामना करत असतात? या आशयाचं त्यांनी कॅप्शन लिहिलं होत. या घटस्फोटाबद्धलच्या पोस्टला अभिषेक बच्चनने लाईक केल्यामुळे त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यात फूट पडली की काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अनंत- राधिकाच्या लग्नसोहळ्यातदेखील अभिषेक बच्चनने आपल्या कुटुंबासोबत हजेरी लावलेली तर ऐश्वर्या राय आपल्या मुलीला घेऊन हजर राहिली होती. ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत एकत्र न आल्याने दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं म्हंटल जात होत. याच्याआधी सुद्धा ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांमधल्या घटस्फोटाच्या चर्चाना उधाण आलं होत. पण अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्या या दोघांनीही कोणतंच वक्तव्य केलेलं नाहीये. आता दोघे याबद्धल काय सांगणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे. अशातच, किंग खान बरोबर अभिनय करताना अभिषेक लवकरच दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांनी लेकाला सोशल मीडियावर या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img