-0.8 C
New York

Ahmednagar Kalyan Accident : कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! 5 जणांचा मृत्यू

Published:

कल्याण-अहमदनगर महामार्गावर (Ahmednagar Kalyan Accident) झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (19 जुलै रोजी) सकाळच्या सुमारास घडला. गुळुंचवाडी येथे भरधाव ट्रकने अनेकांना धडक दिली. या ट्रकने 3 दुचाकी स्वारांना चिरडलं. या अपघातात पाच जण मरण पावले असून अनेकजण जखमी झालेत. अंत्यविधीवरुन परतत असताना अपघात झालाय. गावातील व्यक्तीची अंत्यविधी कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडलं. गावकरी या अपघातानंतर आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

पुणे नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक रस्ता सोडून अंत्यविधीवरुन परतणाऱ्या लोकांमध्ये घुसला. या अपघातात पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर 10 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा ही समावेश आहे. जुन्नर तालुक्यात गुळंचवाडी शिवारात ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने महामार्गावरील आठ ते दहा वाहनांना धडक दिली.

सोलापुरमध्ये भरधाव बस उलटली, भीषण अपघात

Ahmednagar Kalyan Accident नक्की घडलं काय?

महामार्गावर असलेल्या गुळुंचवाडी गावामध्ये अत्यंविधीच्या कार्यक्रमावर परतत असणाऱ्या गावकऱ्यांना या ट्रकने उडवल्याने एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. भरधाव ट्रकने अनेक दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांना अत्यंविधी उकरून हे नागरिक घरी जात असतानाधडक दिली. ट्रक चालकाचं ट्रकवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

Ahmednagar Kalyan Accident स्थानिक नागरिक झाले आक्रमक

भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्यामुळे प्रचंड संतापाची भावना आहे. स्थानिकांनी या अपघाताबद्दल संताप व्यक्त करत आंदोलन सुरु केल्याची माहिती आहे. गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी आटोपून लोक परत येत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img